agriculture news in marathi, american fall army worm on crops, nashik, maharashtra | Agrowon

नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 जुलै 2019

नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव मक्याच्या क्षेत्रावर ९० टक्‍क्यांपेक्षा अधिक दिसून आला. मात्र, आता उपाययोजना केल्यानंतर नुकसान पातळी ३० टक्क्यांवर आली आहे. जिल्ह्यात ४१ हजार ३०० हेक्टरवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. बियाणे दरात झालेली वाढ व कीटकनाशकांवरील खर्च यामुळे एकरी ३ ते ४ हजार रुपये खर्च वाढला आहे. कमी खर्चात असणारे तसेच जिरायत व बागायती क्षेत्रात येणारे मका पीक अळीला बळी पडत आहे. त्यामुळे ऐन आर्थिक कोंडीत हे संकट शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरले आहे.

नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव मक्याच्या क्षेत्रावर ९० टक्‍क्यांपेक्षा अधिक दिसून आला. मात्र, आता उपाययोजना केल्यानंतर नुकसान पातळी ३० टक्क्यांवर आली आहे. जिल्ह्यात ४१ हजार ३०० हेक्टरवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. बियाणे दरात झालेली वाढ व कीटकनाशकांवरील खर्च यामुळे एकरी ३ ते ४ हजार रुपये खर्च वाढला आहे. कमी खर्चात असणारे तसेच जिरायत व बागायती क्षेत्रात येणारे मका पीक अळीला बळी पडत आहे. त्यामुळे ऐन आर्थिक कोंडीत हे संकट शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरले आहे.

जिल्ह्यातील मका लागवडीचे प्रस्तावित क्षेत्र १ लाख ४३ हजार ६४५ हेक्टर असून, १ लाख ४१ हजार ८७६ हेक्टर क्षेत्रावर ९९ टक्के लागवड झाली आहे. नाशिक जिल्ह्यात राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे उत्पादन होते. मागील वर्षीच्या तुलनेत पेरणीनंतर ७० टक्के अधिक क्षेत्रावर प्रादुर्भाव दिसून आला. त्यात सुरवातीला शिफारस नसलेल्या कीटकनाशकांची कृषी निविष्ठा केंद्रातून विक्री झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची बियाण्यानंतर आता कीटकनाशकांच्या माध्यमातून लूट होत असल्याचे दिसून आले. यावर उपाय म्हणून शिफारस केलेल्या कीटकनाशकांची विक्री करणे कृषी निविष्ठा विक्रेत्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर जैविक व रासायनिक फवारण्या केलेली मका क्षेत्रे नियंत्रणाखाली आहेत. त्यामुळे नुकसानीची पातळी कमी होऊन ती ३० टक्के आली आहे. जर पावसाची सुरवात झाली तर अजूनही प्रादुर्भाव आटोक्यात येईल, असे शेतकरी सांगत आहेत. 

अनेक शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करत आहेत. मात्र त्यातही प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्याने काही शेतकरी उभ्या पिकांवर नांगर फिरवीत आहेत, तर काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे आहे. त्यात पाऊस नसल्याने पीक तग धरून राहण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे मका उत्पादन व चारा यावर निश्चित परिणाम होणार आहे.

कृषी विभाग सरसावला 

  • लष्करी अळी नियंत्रणासाठी कृषी विभागाने पेरणीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम तसेच ‘उन्नत शेतकरी समृद्ध शेतकरी’ पंधरवाडा कार्यक्रमात जिल्ह्यातील १७३० गावांमध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन.
  • क्रॉपसॅप योजनेअंतर्गत १६२ शेतीशाळांच्या माध्यमातून बीजप्रक्रिया, कीटकनाशकांची हाताळणी, प्रकाश सापळ्यांचा वापर, कामगंध सापळ्यांचा वापर आदी प्रात्यक्षिके दाखविण्यात आली आहेत. यासाठी शास्त्रज्ञ व कृषी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले आहे.
  • माध्यमांचा वापर करून लघुसंदेशाद्वारे मार्गदर्शक सूचनांचे प्रेषण, घडीपत्रके, दृकश्राव्य माध्यम तसेच व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे. 
  • ज्या भागात प्रादुर्भाव गंभीर स्वरूपाचा आहे, अशा भागात कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ शास्त्रज्ञ यांना बोलवून मार्गदशन करण्यात येत आहे. कृषी विभाग यासाठी सातत्याने बांधापर्यंत संपर्कात आहे.

लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पेरणीपूर्वी जनजागृतीला सुरवात केली. यासाठी विविध मार्गांचा अवलंब करण्यात येत आहे. ज्यामध्ये कृषी विभाग थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन करत आहे. 
- संजीव पडवळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नाशिक


इतर बातम्या
कोल्हापूर : साखर उताऱ्यात खासगी कारखाने...कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात फेब्रुवारीच्या...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
वाशीम जिल्ह्यातील महिला बचतगट डिजिटल...वाशीम : राष्ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक...
जुने वाण राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत...नगर : राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली...
शेतमजुराच्या मुलीने पटकावला ‘शिवछत्रपती...अकोला ः प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर एका खेड्यातील...
साडेआठ हजार कोटी खर्चूनही 'जलयुक्त' फेल...मुंबई : फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी जलयुक्त...
पीक विमा योजना यापुढे ऐच्छिक; केंद्र...नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा...
जातीय सलोख्याला ठेच लागते की काय अशी...जुन्नर, जि. पुणे : सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या...
राज्यातील आजारी यंत्रमाग उद्योग...कडेगाव, जि. सांगली ः राज्यातील आजारी यंत्रमाग...
राज्यात तापमानात चढ-उतार शक्यपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
राज्यासह देशात शिवजयंती उत्साहात साजरीपुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
नगर जिल्ह्यामध्ये कमी पाण्यावरील फळझाडे...नगर : पाच वर्षांपासून दुष्काळाशी सामना करताना...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...