पुणे ः दुष्काळी स्थितीत जनांवरासाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी बारामती तालुका सहकारी दूध
ताज्या घडामोडी
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव
नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव मक्याच्या क्षेत्रावर ९० टक्क्यांपेक्षा अधिक दिसून आला. मात्र, आता उपाययोजना केल्यानंतर नुकसान पातळी ३० टक्क्यांवर आली आहे. जिल्ह्यात ४१ हजार ३०० हेक्टरवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. बियाणे दरात झालेली वाढ व कीटकनाशकांवरील खर्च यामुळे एकरी ३ ते ४ हजार रुपये खर्च वाढला आहे. कमी खर्चात असणारे तसेच जिरायत व बागायती क्षेत्रात येणारे मका पीक अळीला बळी पडत आहे. त्यामुळे ऐन आर्थिक कोंडीत हे संकट शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरले आहे.
नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव मक्याच्या क्षेत्रावर ९० टक्क्यांपेक्षा अधिक दिसून आला. मात्र, आता उपाययोजना केल्यानंतर नुकसान पातळी ३० टक्क्यांवर आली आहे. जिल्ह्यात ४१ हजार ३०० हेक्टरवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. बियाणे दरात झालेली वाढ व कीटकनाशकांवरील खर्च यामुळे एकरी ३ ते ४ हजार रुपये खर्च वाढला आहे. कमी खर्चात असणारे तसेच जिरायत व बागायती क्षेत्रात येणारे मका पीक अळीला बळी पडत आहे. त्यामुळे ऐन आर्थिक कोंडीत हे संकट शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरले आहे.
जिल्ह्यातील मका लागवडीचे प्रस्तावित क्षेत्र १ लाख ४३ हजार ६४५ हेक्टर असून, १ लाख ४१ हजार ८७६ हेक्टर क्षेत्रावर ९९ टक्के लागवड झाली आहे. नाशिक जिल्ह्यात राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे उत्पादन होते. मागील वर्षीच्या तुलनेत पेरणीनंतर ७० टक्के अधिक क्षेत्रावर प्रादुर्भाव दिसून आला. त्यात सुरवातीला शिफारस नसलेल्या कीटकनाशकांची कृषी निविष्ठा केंद्रातून विक्री झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची बियाण्यानंतर आता कीटकनाशकांच्या माध्यमातून लूट होत असल्याचे दिसून आले. यावर उपाय म्हणून शिफारस केलेल्या कीटकनाशकांची विक्री करणे कृषी निविष्ठा विक्रेत्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर जैविक व रासायनिक फवारण्या केलेली मका क्षेत्रे नियंत्रणाखाली आहेत. त्यामुळे नुकसानीची पातळी कमी होऊन ती ३० टक्के आली आहे. जर पावसाची सुरवात झाली तर अजूनही प्रादुर्भाव आटोक्यात येईल, असे शेतकरी सांगत आहेत.
अनेक शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करत आहेत. मात्र त्यातही प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्याने काही शेतकरी उभ्या पिकांवर नांगर फिरवीत आहेत, तर काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे आहे. त्यात पाऊस नसल्याने पीक तग धरून राहण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे मका उत्पादन व चारा यावर निश्चित परिणाम होणार आहे.
कृषी विभाग सरसावला
- लष्करी अळी नियंत्रणासाठी कृषी विभागाने पेरणीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम तसेच ‘उन्नत शेतकरी समृद्ध शेतकरी’ पंधरवाडा कार्यक्रमात जिल्ह्यातील १७३० गावांमध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन.
- क्रॉपसॅप योजनेअंतर्गत १६२ शेतीशाळांच्या माध्यमातून बीजप्रक्रिया, कीटकनाशकांची हाताळणी, प्रकाश सापळ्यांचा वापर, कामगंध सापळ्यांचा वापर आदी प्रात्यक्षिके दाखविण्यात आली आहेत. यासाठी शास्त्रज्ञ व कृषी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले आहे.
- माध्यमांचा वापर करून लघुसंदेशाद्वारे मार्गदर्शक सूचनांचे प्रेषण, घडीपत्रके, दृकश्राव्य माध्यम तसेच व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे.
- ज्या भागात प्रादुर्भाव गंभीर स्वरूपाचा आहे, अशा भागात कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ शास्त्रज्ञ यांना बोलवून मार्गदशन करण्यात येत आहे. कृषी विभाग यासाठी सातत्याने बांधापर्यंत संपर्कात आहे.
लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पेरणीपूर्वी जनजागृतीला सुरवात केली. यासाठी विविध मार्गांचा अवलंब करण्यात येत आहे. ज्यामध्ये कृषी विभाग थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन करत आहे.
- संजीव पडवळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नाशिक
- 1 of 587
- ››