शेतात घेतलेल्या तुतीच्या पिकावरच रेशीम अळ्यांचे संगोपन करून कोषांचे उत्पादन घेतले जाते.
अॅग्रो विशेष
नागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या विळख्यात
नागपूर ः राज्यभरात मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीने थैमान घातले असताना नागपूर विभागातील तीन गावांमध्ये देखील या अळीचा प्रादुर्भाव नुकसान पातळीच्या वर दिसून आला आहे. गेल्या आठवड्यात क्रॉपसॅपअंतर्गत घेण्यात आलेल्या निरीक्षणाअंती अळीचा प्रादुर्भाव दिसल्यानंतर तत्काळ उपाययोजनांचे निर्देश कृषी विभागाकडून देण्यात आले.

नागपूर विभागात सुमारे ३६४६ हेक्टरवर मक्याची लागवड आहे. त्यामध्ये वर्धा जिल्ह्यात ३७९, नागपूर २६८७, भंडारा ४१, गोंदिया २०, चंद्रपूर १२९, गडचिरोली ३९० याप्रमाणे मका लागवड क्षेत्र आहे. विभागात अत्यल्प मका लागवड असली तरी क्रॉपसॅपअंतर्गत घेण्यात आलेल्या निरीक्षणात नरखेड तालुक्यात दोनदा लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. ३ सप्टेंबर रोजी भाईवाडी गावात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला होता. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले.
परंतु, त्यानंतरही भाईवाडी गावात लष्करी अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यात यश आले नाही. त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी पुन्हा भाईवाडी सोबतच माणिकवाडा, मोहाडी (दळवी) या गावांमध्ये देखील लष्करी अळीचा प्रादुर्भाव नोंदविण्यात आला आहे.
- 1 of 652
- ››