अमित शहा यांच्या आज अक्कलकोट, तुळजापूर, औसा, जत येथे सभा

अमित शहा यांच्या आज अक्कलकोट, तुळजापूर, औसा, जत येथे सभा
अमित शहा यांच्या आज अक्कलकोट, तुळजापूर, औसा, जत येथे सभा

सोलापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गुरुवारी (ता. १०) सोलापूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर येत आहेत. सोलापूरसह सांगली, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांतील चार विधानसभा मतदारसंघांत ते प्रचारसभा घेतील. 

गुरुवारी सकाळी ११ वाजता त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. तेथून ते हेलिकॉप्टरने जत (जि. सांगली) येथे जातील. दुपारी १२ वाजता तेथील उमेदवार विलास जगताप यांच्यासाठी ते प्रचारसभा घेतील. त्यानंतर  हेलिकॉप्टरने ते दुपारी दोन वाजता अक्कलकोट येथे येतील. दुपारी सव्वादोन वाजता सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रचारासाठी ते सभा घेतील. 

अक्कलकोट येथील सभा संपल्यानंतर ते हेलिकॉप्टरने तुळजापूरकडे रवाना होतील. त्या ठिकाणी सव्वाचार वाजता भाजपचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. तुळजापूर येथील सभा संपल्यानंतर औसाकडे जातील. औसा येथील सभा संपल्यानंतर ते रात्री लातूर येथे मुक्काम करतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com