सांगलीतील महिलांनी दिली मजुरीची रक्कम कोरोना लढ्यासाठी 

भिलवडी, जि. सांगली : येथील साठेनगर मधील ५१ शेतमजूर महिलांनी एक दिवसाच्या मजुरीची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देऊन दातृत्वाचा वेगळा पायंडा समाजासमोर उभा केला आहे.
The amount of wages paid by the women for the Corona fight
The amount of wages paid by the women for the Corona fight

भिलवडी, जि. सांगली : येथील साठेनगर मधील ५१ शेतमजूर महिलांनी एक दिवसाच्या मजुरीची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देऊन दातृत्वाचा वेगळा पायंडा समाजासमोर उभा केला आहे. 

येथील अण्णा भाऊ साठेनगरमध्ये बहुसंख्य गोरगरीब मजूर राहतात. त्यांची हातावरची पोटं आहे. रोज कुणाच्या तरी बांधाला कामाला जावे तेव्हा कुठे हाता-तोंडाची गाठ पडते, अशी एकंदर इथल्या लोकांची स्थिती आहे. कोरोना विषाणूसारख्या महामारीचे दोन महिन्यांपासून जगभरात थैमान सुरू आहे. हे पुढे कितीकाळ चालेल याबाबत अजुनही अनभिज्ञता आहे. या महामारीने साऱ्या देशाला लॉकडाऊन केले. त्याने आर्थिक चक्रच थांबले आहे . 

ग्रामीण भागात त्याचे परिणाम दिसत आहेत. ही महामारी रोखण्यासाठी केंद्र व राज्यशासन ऐनकेन प्रकाराने प्रयत्न करीत आहे. थांबलेले चक्र सुरू करण्यासाठीच्या उपाययोजनांसाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. इथल्या साठेनगरातील बहुसंख्य मजूर निरक्षर आहे. कोरोनामुळे देश व राज्यावर आलेल्या संकटाची माहिती त्यांनी टीव्हीवर पाहिली अन ऐकली. 

या संकटप्रसंगी आपणही खारीचा वाटा उचलू, अशी खुणगाठ मनी बाळगली. या आवाहनाला प्रतिसाद देत साठेनगरातील या मजुरांनी आपली दिवसभराची कमाई देऊ केली. सुमारे पन्नासभर मजुरांकडून पाच हजार शंभर रूपये जमा झाले. ही रक्कम त्यांनी भारतीय स्टेट बॅंकेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जमा केली. 

उचलला खारीचा वाटा  टाटा-अंबानी सारख्या कुबेरवर्गाचा आर्थिक मदतीचा आकडा भले लाख -कोटींच्या घरात असेल. मात्र, शेतमजुरांची ही छोटी मदत समाजधुरीनांच्या डोळ्यात अंजण घालणारी आहे. 'देणेवाले की नियत देखी जाती है' ही उक्ती त्यांनी सार्थ ठरवली आहे. कारोनाच्या लढ्यात आमाचाही खारीचा वाटा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com