'अम्फान’ चक्रीवादळ निवळले 

बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘अम्फान’ तीव्र चक्रीवादळाने बुधवारी (ता.२०) सायंकाळी पूर्व किनारपट्टीवरील सुंदरबनजवळ असलेल्या पश्‍चिम बंगालच्या दिघा आणि बांग्लादेशाच्या हातीयाजवळ धडकले.
sector
sector

पुणे: बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘अम्फान’ तीव्र चक्रीवादळाने बुधवारी (ता.२०) सायंकाळी पूर्व किनारपट्टीवरील सुंदरबनजवळ असलेल्या पश्‍चिम बंगालच्या दिघा आणि बांग्लादेशाच्या हातीयाजवळ धडकले. जमीनीवर येताच वादळाची तीव्रता कमी होत गेली. गुरूवारी (ता.२१) दुपारी हे वादळ निवळून तीव्र कमी दाब क्षेत्रात रुपांतर झाले होते. या प्रणालीच्या प्रभावामुळे आसाम मेघालयसह ईशान्य भारतातील राज्यात पाऊस सुरू होता. 

बंगालच्या उपसागरात शनिवारी (ता.१६) रात्री उशीरा ‘अम्फान’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. त्यानंतर उत्तरेकडे सरकणाऱ्या ही प्रणाली आणखी तीव्र होत सोमवारी (ता.१८) या प्रणालीचे महाचक्रीवादळात रुपांतर झाले. ताशी २२५ ते २६५ किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहणारे हे वादळ वेगाने जमीनीकडे झेपावण्यास सुरुवात झाली. बुधवारी सायंकाळी हे वादळ १६५ ते १८५ किलोमीटर चक्राकार वाऱ्यासह किनाऱ्याला धडकले. यामुळे पूर्व किनारपट्टीवरील ओडीशा आणि पश्‍चिम बंगाल राज्यांना तडाखा बसला. 

जमीनीवर येताच वादळाची तीव्रता वेगाने कमी होऊ लागली. गुरूवारी सकाळी ८ वाजता वादळाचे केंद्र कोलकात्यापासून उत्तरेकडे २७० किलोमीटर अंतरावर होते. साडे ११ वाजण्याच्या सुमारास त्याचे कमी तीव्रतेच्या वादळात (डीप डिप्रेशन) तर त्यानंतर तीव्र कमी दाब क्षेत्रात रुपांतर होत गेले. वादळ निवळताच पूर्व आणि ईशान्य भारतातील ढगांचे अच्छादन हळूहळू विरळ होत गेले. पश्‍चिम बंगाल, सक्कीम, आसाम, मेघालय राज्यात गुरूवारी (ता.२१) दिवसभर हलका ते जोरदार पाऊस पडत होता.  मॉन्सून जैसे थे  बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांना (मॉन्सून) चालना मिळाली. रविवारी (ता.१७) मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांवर डेरेदाखल झाला. मात्र हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकून गेल्यानंतर मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाला. सलग चौथ्या दिवशी गुरूवारी (ता.२१) मॉन्सूनची काणतीही प्रगती झाली नाही. चक्रीवादळामुळे प्रभावित झालेले प्रवाह सुरळीत होण्यास काही कालावधी लागणार असून, त्यानंतरच अंदमान बेटांच्या आणखी काही प्रगती होईल असे, हवामान विभागाच्या सुत्रांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com