agriculture news in Marathi AMPHAN cyclone weaken Maharashtra | Page 2 ||| Agrowon

'अम्फान’ चक्रीवादळ निवळले 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 मे 2020

बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘अम्फान’ तीव्र चक्रीवादळाने बुधवारी (ता.२०) सायंकाळी पूर्व किनारपट्टीवरील सुंदरबनजवळ असलेल्या पश्‍चिम बंगालच्या दिघा आणि बांग्लादेशाच्या हातीयाजवळ धडकले. 

पुणे: बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘अम्फान’ तीव्र चक्रीवादळाने बुधवारी (ता.२०) सायंकाळी पूर्व किनारपट्टीवरील सुंदरबनजवळ असलेल्या पश्‍चिम बंगालच्या दिघा आणि बांग्लादेशाच्या हातीयाजवळ धडकले. जमीनीवर येताच वादळाची तीव्रता कमी होत गेली. गुरूवारी (ता.२१) दुपारी हे वादळ निवळून तीव्र कमी दाब क्षेत्रात रुपांतर झाले होते. या प्रणालीच्या प्रभावामुळे आसाम मेघालयसह ईशान्य भारतातील राज्यात पाऊस सुरू होता. 

बंगालच्या उपसागरात शनिवारी (ता.१६) रात्री उशीरा ‘अम्फान’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. त्यानंतर उत्तरेकडे सरकणाऱ्या ही प्रणाली आणखी तीव्र होत सोमवारी (ता.१८) या प्रणालीचे महाचक्रीवादळात रुपांतर झाले. ताशी २२५ ते २६५ किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहणारे हे वादळ वेगाने जमीनीकडे झेपावण्यास सुरुवात झाली. बुधवारी सायंकाळी हे वादळ १६५ ते १८५ किलोमीटर चक्राकार वाऱ्यासह किनाऱ्याला धडकले. यामुळे पूर्व किनारपट्टीवरील ओडीशा आणि पश्‍चिम बंगाल राज्यांना तडाखा बसला. 

जमीनीवर येताच वादळाची तीव्रता वेगाने कमी होऊ लागली. गुरूवारी सकाळी ८ वाजता वादळाचे केंद्र कोलकात्यापासून उत्तरेकडे २७० किलोमीटर अंतरावर होते. साडे ११ वाजण्याच्या सुमारास त्याचे कमी तीव्रतेच्या वादळात (डीप डिप्रेशन) तर त्यानंतर तीव्र कमी दाब क्षेत्रात रुपांतर होत गेले. वादळ निवळताच पूर्व आणि ईशान्य भारतातील ढगांचे अच्छादन हळूहळू विरळ होत गेले. पश्‍चिम बंगाल, सक्कीम, आसाम, मेघालय राज्यात गुरूवारी (ता.२१) दिवसभर हलका ते जोरदार पाऊस पडत होता. 

मॉन्सून जैसे थे 
बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांना (मॉन्सून) चालना मिळाली. रविवारी (ता.१७) मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांवर डेरेदाखल झाला. मात्र हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकून गेल्यानंतर मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाला. सलग चौथ्या दिवशी गुरूवारी (ता.२१) मॉन्सूनची काणतीही प्रगती झाली नाही. चक्रीवादळामुळे प्रभावित झालेले प्रवाह सुरळीत होण्यास काही कालावधी लागणार असून, त्यानंतरच अंदमान बेटांच्या आणखी काही प्रगती होईल असे, हवामान विभागाच्या सुत्रांनी सांगितले. 


इतर अॅग्रो विशेष
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा उद्यापासून...औरंगाबाद ः कृषी निविष्ठा  विक्रेत्यांच्या...
सफरचंद झाडाला फळधारणा ! नाशिकच्या...नाशिक : जिल्हा फलोत्पादन व विविध प्रयोगात आघाडीवर...
कोल्हापूर जिल्ह्यातील ३१ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पडणाऱ्या...
एकाच आॅनलाइन अर्जावर कृषी योजनांचा लाभ...मुंबई  : कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ...
लातूर जिल्ह्यात पोलिसांनी बांधावर जात...लातूर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या...
न्यायालयाच्या भूमिकेनंतर गुणनियंत्रण...पुणे  : बियाण्यांमध्ये शेतकऱ्यांच्या...
वर्षभर विविध भाज्यांची चक्राकार...अवर्षणग्रस्त असलेल्या सालवडगाव (ता. नेवासा, जि....
संकटांशी सामना करीत टिकवली प्रयोगशीलतादाभाडी (ता.मालेगाव, जि. नाशिक) येथील धनराज निकम...
वाद-प्रतिवादांचा खेळ अन् हतबल शेतकरीनिकृष्ट बियाण्यांमुळे सोयाबीन न उगवल्याच्या...
शेतकऱ्यांनो, एक वर्ष सुटी घ्यायची का?जगभरात जनुकीय सुधारित (जेनिटिकली मॉडिफाइड/जीएम)...
...अन्यथा कृषी सहसंचालकांना अटक करून...औरंगाबाद ः सोयाबीनच्या बोगस बियाणे प्रकरणात...
`गोसेखुर्द'चे भू-संपादन संपेनानागपूर : गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामाचा...
काटेपूर्णा, पेनटाकळी, खडकपूर्णा ...अकोला ः वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांत आत्तापर्यंत...
नगर जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात...नगर  ः जिल्ह्यात यंदा सुरुवातीपासूनच चांगला...
दुग्धोत्पादकांना लिटरमागे १० ते १२...नगर ः अनेक शेतकऱ्यांसह बेरोजगारीवर मात करण्यासाठी...
धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोरपुणे : कोकण किनारपट्टीलगतच्या अरबी समुद्रात...
अमेरिकन लष्करी अळीचे मका पिकावर आक्रमणपुणे ः खरिपाची पेरणी होऊन महिना उलटत नाही तोच...
रासायनिक अवशेष काढण्यासाठी 'अर्का...नाशिक ः फळे आणि भाजीपाला पिकांवर रासायनिक...
देशात ९२ लाख हेक्टरवर कापूसमुंबई: देशात कापूस लागवडीने वेग घेतला आहे....
राज्यातील धरणांमध्ये २८ टक्के पाणीसाठापुणे : जून महिन्यात पावसाने सरासरी गाठली, तसेच...