Cyclone Amphan : `अम्फान’ महाचक्रीवादळ आज धडकणार 

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘अम्फान’ महाचक्रीवादळ आज (ता.२०) सायंकाळनंतर पूर्व किनारपट्टीला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
`अम्फान’ महाचक्रीवादळ आज धडकणार 
`अम्फान’ महाचक्रीवादळ आज धडकणार 

पुणे: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘अम्फान’ महाचक्रीवादळ आज (ता.२०) सायंकाळनंतर पूर्व किनारपट्टीला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे. पश्‍चिम बंगालमधील दिघा आणि बांग्लादेशातील हातिया बेटांजवळ ही वादळी प्रणाली जमीनीवर येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. चक्रीवादळ जमिनीवर प्रवेश करताना ताशी १५५ ते १६५ किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. ओडिशा, पश्‍चिम बंगालमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडणार असून, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. 

बंगालच्या उपसागरात शनिवारी (ता.१६) रात्री उशीरा ‘अम्फान’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. दोन दिवसापासून या वादळाची तीव्रता वाढत गेली. सोमवारी (ता.१८) या प्रणालीचे महाचक्रीवादळात रुपांतर झाले. ताशी २२५ ते २४५ किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहणाऱ्या या वादळी प्रणालीचे केंद्र सकाळी ओडिशाच्या परादीपपासून ४८० किलोमीटर, पश्‍चिम बंगालच्या दिघापासून ६३० किलोमीटर दक्षिणेकडे होते. चक्रीवादळाचे वेगाने जमीनीकडे झेपावत असून, त्याचे केंद्र ताशी १५ किलोमीटर वेगाने उत्तरेकडे सरकत आहेत. मंगळवारी (ता. १९) या वादळाची तीव्रता काहीशी कमी होण्यास सुरूवात झाली आहे.  आज (ता.२०) संध्याकाळी हे वादळ पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्याला धडण्याची शक्यता आहे. या वादळामुळे ओडिशा, पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर सिक्कीम आणि आसाम मेघालयातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळ जमीनीवर येताना उत्तर ओडिशा, पश्‍चिम बंगालच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे वाहून पाऊस पडणार आहे. तर समुद्रात तीन ते पाच मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता असल्याने किनारपट्टीपासून दूर राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.  या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा धोका  पश्‍चिम बंगालमधील मेदिनीपूर, दक्षिण आणि उत्तर २४ परगना, हावडा, हुगळी, कलकत्ता जिल्हा, तर ओडिशामधील जगतसिंगपूर, केंद्रपारा, भद्रक, बालासोर, जयपूर, मयुरभंज या जिल्ह्यांमध्ये वादळाचा प्रभाव अधिक जाणवणार असून, कच्ची घरे, जुन्या इमारती, वीजेचे खांब, शेतातील उभी पीके, फळझाडे, नारळाची झाडे कोसळण्याची शक्यता असून, विमान सेवेवरही परिणाम होणार आहे.१८ ते २० मे दरम्यान नागरिकांनी घरात रहावे, तसेच सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सुचना हवामान विभागाने स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com