agriculture news in Marathi AMPHAN cyclone will hit to beach today Maharashtra | Page 2 ||| Agrowon

`अम्फान’ महाचक्रीवादळ आज धडकणार 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 मे 2020

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘अम्फान’ महाचक्रीवादळ आज (ता.२०) सायंकाळनंतर पूर्व किनारपट्टीला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘अम्फान’ महाचक्रीवादळ आज (ता.२०) सायंकाळनंतर पूर्व किनारपट्टीला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे. पश्‍चिम बंगालमधील दिघा आणि बांग्लादेशातील हातिया बेटांजवळ ही वादळी प्रणाली जमीनीवर येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. चक्रीवादळ जमिनीवर प्रवेश करताना ताशी १५५ ते १६५ किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. ओडिशा, पश्‍चिम बंगालमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडणार असून, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. 

बंगालच्या उपसागरात शनिवारी (ता.१६) रात्री उशीरा ‘अम्फान’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. दोन दिवसापासून या वादळाची तीव्रता वाढत गेली. सोमवारी (ता.१८) या प्रणालीचे महाचक्रीवादळात रुपांतर झाले. ताशी २२५ ते २४५ किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहणाऱ्या या वादळी प्रणालीचे केंद्र सकाळी ओडिशाच्या परादीपपासून ४८० किलोमीटर, पश्‍चिम बंगालच्या दिघापासून ६३० किलोमीटर दक्षिणेकडे होते.

चक्रीवादळाचे वेगाने जमीनीकडे झेपावत असून, त्याचे केंद्र ताशी १५ किलोमीटर वेगाने उत्तरेकडे सरकत आहेत. मंगळवारी (ता. १९) या वादळाची तीव्रता काहीशी कमी होण्यास सुरूवात झाली आहे. 

आज (ता.२०) संध्याकाळी हे वादळ पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्याला धडण्याची शक्यता आहे. या वादळामुळे ओडिशा, पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर सिक्कीम आणि आसाम मेघालयातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळ जमीनीवर येताना उत्तर ओडिशा, पश्‍चिम बंगालच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे वाहून पाऊस पडणार आहे. तर समुद्रात तीन ते पाच मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता असल्याने किनारपट्टीपासून दूर राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. 

या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा धोका 
पश्‍चिम बंगालमधील मेदिनीपूर, दक्षिण आणि उत्तर २४ परगना, हावडा, हुगळी, कलकत्ता जिल्हा, तर ओडिशामधील जगतसिंगपूर, केंद्रपारा, भद्रक, बालासोर, जयपूर, मयुरभंज या जिल्ह्यांमध्ये वादळाचा प्रभाव अधिक जाणवणार असून, कच्ची घरे, जुन्या इमारती, वीजेचे खांब, शेतातील उभी पीके, फळझाडे, नारळाची झाडे कोसळण्याची शक्यता असून, विमान सेवेवरही परिणाम होणार आहे.१८ ते २० मे दरम्यान नागरिकांनी घरात रहावे, तसेच सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सुचना हवामान विभागाने स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. 


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात टोळधाडीची दहशत कायम;...नागपूर ः अमरावती जिल्ह्यातील पुसला गावातून...
राजस्थानातील चुरूत ५० अंशांवर तापमान;...पुणे  : सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने...
मॉन्सून ४८ तासांमध्ये दक्षिण अरबी...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
एसटीव्दारे शेतीमाल वाहतूक सुरु...पुणे  ः ‘कोरोना’मुळे महाराष्ट्र राज्य परिवहन...
तंत्रज्ञान आत्मसात करीत प्रयोगशील शेतीत...अकोला जिल्ह्यातील आस्टुल येथील संतोष घुगे यांनी...
मॉन्सूनची अंदमानात चाल;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
टोळधाडीकडून भाजीपाल्याचे सर्वाधिक...नागपूर : राजस्थान, मध्यप्रदेशनंतर टोळधाडीचा...
उन्हाच्या झळांनी काहीली वाढली पुणे : सुर्य चांगलाच तळपत असल्याने...
केळी ‘रायपनिंग चेंबर’ व्यवसाय झाला पूरक...सातारा जिल्ह्यातील अनवडी (ता. वाई) येथील प्रवीण...
अंदमानात उद्या मॉन्सूनची प्रगती शक्य पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...
राज्यात कापूस बियाणे विक्रीला प्रारंभ अकोला ः आगामी हंगामासाठी कापूस बियाणे...
मध्यम धाग्याच्या कापूस खरेदीची ...नागपूर ः एफएक्‍यु ग्रेडमधीलच तिसऱ्या दर्जाच्या...
मराठवाडा पाणी परिषदेचे शनिवारी ऑनलाइन...औरंगाबाद: लॉकडाउनमुळे मराठवाडा पाणी परिषदेची...
'ग्रामपंचायतीचा अखर्चित निधी शासनाला...अकोला ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरु...
टोळधाडीचा अमरावती, वर्ध्यात शिरकावअमरावती ः लॉकडाउनमुळे आधीच अडचणीत असलेल्या...
सव्वा एकरांत सेंद्रिय भाज्यांचा `जगदाळे...कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथील...
टोळधाडीचा आठ राज्यांमध्ये धुडगूसपुणेः देशात एरव्ही जून आणि जुलैमध्ये येणाऱ्या...