agriculture news in marathi Amphan cylone land between digha and hatiya | Page 2 ||| Agrowon

‘अम्फान’ चक्रीवादळ किनाऱ्याला धडकले

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 मे 2020

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘अम्फान’ तीव्र चक्रीवादळ बुधवारी (ता.20) दुपारी चार वाजल्यानंतर पूर्व किनारपट्टीवरील सुंदरबनजवळ असलेल्या पश्‍चिम बंगालच्या दिघा आणि बांग्लादेशाच्या हातीयाजवळ धडकले.

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘अम्फान’ तीव्र चक्रीवादळ बुधवारी (ता.20) दुपारी चार वाजल्यानंतर पूर्व किनारपट्टीवरील सुंदरबनजवळ असलेल्या पश्‍चिम बंगालच्या दिघा आणि बांग्लादेशाच्या हातीयाजवळ धडकले. जमीनीवर येताना वादळात ताशी 155 ते 185 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. ओडिशा आणि पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्यावर पावसाचा जोरही चांगलाच वाढला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. जमीनीवर येताच वादळाचा वेग कमी होण्यास सुरवात झाली आहे.

बंगालच्या उपसागरात शनिवारी (ता.16) ‘अम्फान’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. त्यानंतर या प्रणालीची तीव्रता वाढत गेली. सोमवारी (ता.18) या प्रणालीचे महाचक्रीवादळात रुपांतर झाले. तर बुधवारी (ता.20) दुपारनंतर या महावादळाची तीव्रता कमी होऊ लागली. सकाळी पश्‍चिम बंगालमध्ये दहा वाजल्यापासूनच वादळाचा प्रभाव वाढू लागला होता. दुपारी तीन वाजता जमीनीवर येण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. यावेळी वादळाचे केंद्र पश्‍चिम बंगालच्या दिघापासून 65 किलोमीटर तर बांग्लादेशाच्या सागर बेटापासून 35 किलोमीअर अंतरावर समुद्रात होते. ते ताशी 20 किलोमीटर वेगाने जमीनीकडे झेपावत होते. या वादळाच्या प्रभावमुळे ओडीशा परादीप आणि परीसरावर मुसळधार पावसाने हजेरी लावली बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत परादीप येथे 82 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 

दुपारनंतर हे वादळ परादीपच्या किनाऱ्यापासून उत्तरेकडे पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्याकडे सरकू लागले. या वादळाच्या प्रभावामुळे किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे वाहत होते. आकाशात 14 किलोमीटर उंचीपर्यंत दाट ढग जमा झाले होते. तसेच मुसळधार पावसाला सुरवात झाली होती. तर किनारपट्टीलगत 4 मीटर उंचीपर्यंत लाटा उसळत असल्याने सखल भागात पाणी भरू लागले. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास या वादळ जमीनीवर आल्यानंतर त्याची तीव्रता कमी होत असून, ही प्रणाली उत्तरेकडे सरकत असल्याने सिक्कीमसह ईशान्य भारतातील राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

साडेचार लाख लोकांना हलविले
वादळाच्या तडाख्यातून वाचविण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दलामार्फत (एनडीआरएफ) युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. वादळाच्या पार्श्र्वभुमीवर ओडीशा आणि पश्‍चिम बंगालमधील सुमारे साडे चार लाख नागरिकांना सरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्याचे एनडीआरएफचे प्रमुख एस. एन. प्रधान यांनी सांगितले. जोरदार चक्राकार वाऱ्यामुळे कच्ची घरे, जुन्या इमारती, वीजेचे खांब, शेतातील उभी पीके, फळझाडे यांना वादळाचा तडाखा बसला आहे. मालमत्तेचे नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे.


इतर अॅग्रो विशेष
Breaking : मॉन्सून एक्सप्रेस केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
राज्य सरकारचे ‘पुनश्‍च हरीओम्’ :...मुंबई : कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
अंतिम वर्षाची परीक्षा नाही :...मुंबई : सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या...
पीकविम्याचे कामकाज या महिन्यातपुणे: राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा...
टोळधाडबाधितांना मदत देणार : पंतप्रधान...नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत टोळधाडीचे संकट...
मॉन्सून आज केरळात येण्याचे संकेतपुणे  : अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांलगत...
कोकणात मुसळधार पावसाचा इशारापुणे  : अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे...
आठवडाभरापासून टोळधाड विदर्भातचनागपूर   ः गेल्या आठवडाभरापासून...
परभणीतील खरेदी केंद्रावर कापूस विक्रीत...परभणी  ः राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
चाकणच्या जनावरे बाजारात एक कोटींची...पुणे  ः गेल्या सव्वा दोन महिन्यांपासून ‘...
भाजीपाला लागवडीतून उघडला प्रगतीचा मार्गसोयाबीन, भात अशा पारंपरिक कोरडवाहू पिकांवर भिस्त...
सक्रिय रुग्णांची संख्या घटली; एका...नवी दिल्ली : कोरोना महामारीविरूद्धच्या...
विदर्भात टोळधाडीची अस्तित्व कायमनागपूर : कृषी विभागाकडून टोळधाड नियंत्रणासाठी...
राज्यातील भाजीपाला लागवड खोळंबली कोल्हापूर: सध्याच्या स्थितीत भाजीपाल्याचे...
राज्यात देशी कोंबडी पिलांना मागणी वाढली नगर ः काही महिन्यांपूर्वी कोरोना आणि चिकनबाबत...
शेतकऱ्यांची खत विक्री दरात फसवणूक करू...बुलडाणा ः या खरीप हंगामात शेतकऱ्यांना रास्त...
राज्यात बेदाण्याचे सव्वा दोन लाख टन...सांगली : यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर ‘कोरोना...
मॉन्सूनची आणखी प्रगती शक्यपुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) मजल...