Agriculture news in marathi; In the Amravati district, the percentage of nationalized banks declined in debt relief | Agrowon

अमरावती जिल्ह्‍यात कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांचा टक्‍का घसरला
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 जून 2019

अमरावती ः जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यांत लक्ष्याकांच्या केवळ १३ टक्‍केच कर्जवाटप झाले आहे. परिणामी, खरीप पीककर्जासाठी बॅंकांच्या असहकाराचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. 

अमरावती ः जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यांत लक्ष्याकांच्या केवळ १३ टक्‍केच कर्जवाटप झाले आहे. परिणामी, खरीप पीककर्जासाठी बॅंकांच्या असहकाराचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. 

जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात आली. यासाठी जिल्ह्यात १ लाख ९८ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. गेल्या दोन वर्षांत १५ ग्रीन लिस्टनुसार १ लाख ५८ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. अद्यापही ४० हजार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेतच आहेत. या शेतकऱ्यांना कर्जही मिळत नाही अन् कर्जमाफीचा लाभही नाही. मात्र, जे शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले. नव्या कर्जासाठी त्यांच्यावर देखील बॅंकांनी उंबरठे झिजवण्याची वेळ आणली आहे.

यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बॅंकांना १६८५ कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. त्यातुलनेत गेल्या अडीच महिन्यात २३ हजार ५८४ शेतकऱ्यांना २२३ कोटी ३६  लाख रुपयांचेच कर्जवाटप करण्यात आले. कर्जवाटपाची टक्‍केवारी अवघी १३ आहे. त्यावरुनच बॅंकांच्या आणि प्रशासनाच्या हेतूवर शंका उपस्थित होत आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांना ११४० कोटी ५० लाख रुपयांच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना ७४३६ शेतकऱ्यांना ८७ कोटी ८८ लाख रुपयांचे वाटप झाले. त्याची टक्‍केवारी अवघी आठ आहे.

ग्रामीण बॅंकांना १४ कोटी ५० लाखांचे लक्ष्यांक असताना २२८ शेतकऱ्यांना २ कोटी ३६ लाख रुपयांचेच कर्जवाटप आजवर झाले आहे. याची टक्‍केवारीदेखील आठ इतकीच आहे. गेल्यावर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी पीक कर्जवाटपास टाळाटाळ करणाऱ्या सहा बॅंकांतील कार्यालयीन खाती बंद केली होती. यावर्षी जिल्हाधिकारी शैलेश नवाल या संदर्भाने कोणती कारवाई करतात याकडे साऱ्यांचे लक्ष्य लागले आहे. 

जिल्हा बॅंकेने केले २५ टक्‍के वाटप 
जिल्हा बॅंकेला ५३० कोटींच्या कर्जवाटपाचा लक्ष्यांक असताना १५ हजार ९२० शेतकऱ्यांना १३३ कोटी १२ लाखांचे वाटप करण्यात आले. जिल्हा बॅंकेची पीक कर्जवाटपाची टक्‍केवारी २५ आहे.

इतर बातम्या
कापूस लोकायची लाज राखते; पण आमचं काय? यवतमाळ : ‘‘आमच्या कापसापासून तयार कपड्यानं आमी...
अकोल्याचा रब्बी हंगाम दीड लाख हेक्टरवर...अकोला  ः खरिपात पिकांचे नुकसान झाल्याने काही...
सोलापूर जिल्ह्यात नुकसानभरपाईसाठी २०४...सोलापूर : यंदा ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या...
पुणे : नुकसानग्रस्त भाजीपाला पिकांचे...पुणे ः मॉन्सुनोत्तर पावसामुळे पुणे विभागात नऊ...
अमरावती जिल्ह्यात ज्वारी ठरेल रब्बीत...अमरावती  ः मध्यम जमीन व सिंचनाच्या सोयी...
साहेब, संत्रा उत्पादकांचे प्रश्‍न सोडवा...नागपूर ः ‘‘दुचाकी, कार आणि घर घेण्यासाठी कर्जाचे...
परभणी : दूधातील घट ऑक्टोबरमध्येही कायमपरभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत येथील दुग्ध...
सटाणा तालुक्यात शेतीशेजारील पाझर तलाव...नाशिक  : सटाणा तालुक्यातील चौगाव, अजमीर...
सातारा जिल्ह्यात भूजल पातळीत वाढसातारा ः जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टी,...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप...
एकदम बाजार समित्या बरखास्त करू नका:...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बाजार समित्या...
कोल्हापूरच्या पूर्वेकडच्या भागात...कोल्हापूर : एकेकाळी सोयाबीनच्या उत्पादनात अग्रेसर...
ओला दुष्काळ जाहीर करा; बच्चू कडूंचे...मुंबई : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून...
गुलटेकडीत कांद्याच्या आवकेत घटपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दक्षिण आफ्रिकेतील हापूस आंबा सांगलीतसांगली : आंब्याचा हंगाम सुरू होण्यास अद्याप...
परभणीत शेतकरी संघर्ष समितीचे रास्ता...परभणी ः जिल्ह्यात मॉन्सुनोत्तर पाऊस आणि...
पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा कंपनीसमोर...पुणे ः मागील २०१८ या वर्षातील बीड जिल्ह्यातील...
पंतप्रधान मोदी आणि शिवसेनेत दरी निर्माण...मुंबई ः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना...
पावसाने मोसंबीच्या उत्पादनातही संकटाची...औरंगाबाद : लिंबूवर्गीय फळपिकात 'राजा' पीक म्हणून...
आंतरराष्ट्रीय द्राक्ष चर्चासत्र आजपासूनपुणे: राष्ट्रीय द्राक्ष संशोधन (एनआरसीजी)...