पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी ५
ताज्या घडामोडी
अमरावती जिल्ह्याला २४ टक्के नुकसानभरपाई निधी प्राप्त
अमरावती : मॉन्सूनोत्तर पावसाचा जिल्ह्यात ८० टक्के क्षेत्राला फटका बसला. त्यापोटी सुमारे २९८ कोटी ९१ लाख ८० हजार ८०० रुपयांचा मदतनिधी आवश्यक असताना अवघा ७२ कोटी ४० लाख ९३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आवश्यक मदतीच्या २४.१८ टक्केच हा निधी असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.

जिल्हयात १७ ते २८ ऑक्टोबर दरम्यान मॉन्सूनोत्तर पावसाने हजेरी लावली होती. दहा दिवसांत बसलेल्या या पावसामुळे तीन लाख ७४ हजार ८०४ शेतकऱ्यांच्या तीन लाख ७३ हजार १९ हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यासाठी ८ हजार रुपये हेक्टर व दोन हेक्टर या मर्यादेत २९८ कोटी ४१ लाख ५८ हजार ४०० रुपयांचा मदतनिधी आवश्यक आहे.
बागायतीला पिकांसाठी बाधित ४५२.१२ हेक्टरसाठी १८ हजार रुपयांप्रमाणे ८१ लाख ३८ हजार १६० रुपये तर बहुवार्षिक पिकासाठी ७८ हेक्टरला १८ हजार रुपयांप्रमाणे १४ लाख ४ हजार असे एकूण २९९ कोटी ३७ लाख २ हजार रुपयांची गरज आहे. परंतु यांपैकी केवळ ७२ कोटी ४० लाख ९३ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा निधी सर्वच तालुक्यांना पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली.
तालुकानिहाय उपलब्ध निधी (रुपयांत)
अमरावती | ८,४५,६४,२९६ |
भातकुली | ६,९०,१६,४९६ |
तिवसा | ३,०७,७७,२३३ |
चांदूर रेल्वे | ४,४०,०४,२८५ |
अंजनगाव | ६,३८,६२,१७७ |
धामणगाव | ६,८०,७७,२३३ |
नांदगाव | ७,२४,४६,५८५ |
मोर्शी | १,९१,७६,२३४ |
अचलपूर | ५,८६,४३,५९६ |
चांदूरबाजार | ६,०३''६३,७५७ |
दर्यापूर | ६,८७,९९,००५ |
धारणी | ४,२९,५८,४७६ |
चिखलदरा | ४,१४,०३,०७६ |
एकूण | २९८ कोटी ९१ लाख ८० हजार ८०० रुपये |
- 1 of 579
- ››