अमरावती जिल्ह्यात ओलाव्यानंतरही रब्बीची ७९ टक्‍केच पेरणी

अमरावती जिल्ह्यात ओलाव्यानंतरही रब्बीची ७९ टक्‍केच पेरणी
अमरावती जिल्ह्यात ओलाव्यानंतरही रब्बीची ७९ टक्‍केच पेरणी

अमरावती  ः मॉन्सूनोत्तर पाऊस आणि अवकाळी पावसाने जमिनीत ओलावा असल्याने या वर्षी रब्बी हंगामात सरासरी क्षेत्रावर पेरणीची अपेक्षा होती. परंतु कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात ७९.३२ टक्‍के क्षेत्रावरच रब्बीची पेरणी झाली आहे. रब्बीची सर्वांत कमी ३३ टक्‍के पेरणी मोर्शी तालुक्‍यात झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली.  खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने खंड दिला. त्यामुळे अनेक भागात दुबार, तिबार पेरणी झाली. त्यानंतर संततधार पावसाने देखील पिकाची उत्पादकता प्रभावित झाल्याने शेतकरी हवालदील झाले होते. खरिपाची दाणादाण उडविणारा हा पाऊस रब्बी पिकांसाठी पोषक ठरेल, अशी अपेक्षा होती.  परंतु जिल्ह्यात रब्बीची पेरणी केवळ ७९.३२ टक्‍के क्षेत्रावरच झाली आहे. १ लाख ३४ हजार ३१४ हेक्‍टर इतके हे क्षेत्र आहे. त्यामध्ये सर्वाधिक ९३ हजार ४९० हेक्‍टर क्षेत्र हरभऱ्याखालील असल्याचेही सांगण्यात आले.  यंदा हरभऱ्याखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. यामध्ये धारणी तालुक्‍यात १०,६०३ हेक्‍टर, चिखलदरा तालुक्‍यात ४६८२, भातकुली ७६६६, नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यात ७०७२, चांदूर रेल्वे ३६२९, तिवसा ५७३८, मोर्शी ४८२९, वरुड २८०३, दर्यापूर १८१३९, अंजनगावसूर्जी ५३५५, अचलपूर ५२७६, चांदूररेल्वे ९७२०, धामणगावरेल्वे ६२२६ याप्रमाणे क्षेत्र आहे. असे आहे तालुकानिहाय क्षेत्र धारणी ः १७ हजार ५७६ , चिखलदरा ः ३ हजार ८५२, अमरावती ः ६ हजार ३९६, भातकुली ः ७ हजार ९४७, नांदगाव खंडेश्‍वर ः १५ हजार ८७, चांदूर रेल्वे ः ५ हजार ४६८. तिवसा ः ८ हजार १३७, मोर्शी ः ८ हजार ९५, वरुड ः ५ हजार ६६१, दर्यापूर ः १८ हजार ४६८, अंजनगावसूर्जी ः ६ हजार ४८, अचलपूर ः ८ हजार ५७८, चांदूर बाजार ः ११ हजार १४९. धामणगाव रेल्वे ः ११ हजार ८१७.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com