अमरावती जिल्ह्यात ९० हजार शेतकऱ्यांना मिळणार कर्ज

अमरावती जिल्ह्यात ९० हजार शेतकऱ्यांना मिळणार कर्ज
अमरावती जिल्ह्यात ९० हजार शेतकऱ्यांना मिळणार कर्ज

अमरावती  ः पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत कोणत्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांकरिता विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. ९० हजार ४६८ शेतकऱ्यांना या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.  जिल्ह्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे एकूण २ लाख ८८ हजार ४६८ लाभार्थी आहेत. यातील १ लाख ९८ हजार खातेदारांना पीक कर्जपुरवठा करण्यात आला. ९० हजार ४६८ शेतकरी शिल्लक आहेत. त्यांनी कोणत्याही बॅंकेचे कर्ज घेतले नाही. त्यांना कर्जाचा लाभ देण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. या शेतकऱ्यांना सुटसुटीत अर्ज करता यावा, यासाठी आरबीए संस्थेकडून एक पाणी सुटसुटीत अर्जाचा नमुना बॅंकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.  लाभार्थी शेतकऱ्यांनी या अर्जासोबत शेतीचे उतारे व कर्ज नसल्याचे घोषणापत्र घेऊन ज्या बॅंकेकडून पीएम किसान योजनेचा लाभ घेतलेला आहे. तेथे संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी नवाल म्हणाले. सर्व तलाठी ग्रामसेवक व कृषी सहायकांनी याकरिता गावपातळीवर विशेष मोहीम राबविण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले आहे. प्रोसेसिंग चार्जेस माफ कोणत्याही बॅंक अथवा वित्तीय संस्थेमध्ये पीककर्ज नसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज प्रोसेसिंग शुल्क व निरीक्षण खर्च माफ करण्यात येणार आहे. परिपूर्ण अर्ज आवश्‍यक कागदपत्रांसह १५ दिवसात शेतकऱ्यांना बॅंकामार्फत किसान क्रेडिट कार्ड योजने अंतर्गत पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com