Agriculture news in Marathi, In Amravati division, the number of poisonings patients reached thousands | Agrowon

अमरावती विभागात विषबाधितांची संख्या पोचली हजारांवर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

अमरावती ः राज्यात दोन वर्षांपूर्वी फवारणीदरम्यान एकट्या यवतमाळ जिल्ह्यात २२ जणांचा मृत्यू आणि एक हजारांवर बाधित रुग्ण होते. यावर्षी व्यापक जाणीवजागृतीच्या परिणामी बाधितांची संख्या अमरावती विभागात हजारांवर पोचली असली तरी एक एप्रिलपासून एकाही बाधिताच्या मृत्यूची नोंद मात्र नाही. त्यामुळे कृषी विभागासह सर्वच यंत्रणांचे प्रयत्न फळास येत त्यांना दिलासा मिळण्यास मदत झाली आहे. 

अमरावती ः राज्यात दोन वर्षांपूर्वी फवारणीदरम्यान एकट्या यवतमाळ जिल्ह्यात २२ जणांचा मृत्यू आणि एक हजारांवर बाधित रुग्ण होते. यावर्षी व्यापक जाणीवजागृतीच्या परिणामी बाधितांची संख्या अमरावती विभागात हजारांवर पोचली असली तरी एक एप्रिलपासून एकाही बाधिताच्या मृत्यूची नोंद मात्र नाही. त्यामुळे कृषी विभागासह सर्वच यंत्रणांचे प्रयत्न फळास येत त्यांना दिलासा मिळण्यास मदत झाली आहे. 

२०१६-१७ या वर्षात कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठे प्रयत्न केले होते. त्याअंतर्गत शिफारशीत नसलेल्या कीटकनाशके एकत्रित करून त्याची फवारणी करण्यात आली. या अघोरी उपचारादरम्यान शेतकऱ्यांना विषबाधा होत. तब्बल २२ जणांचा मृत्यू एकट्या यवतमाळ जिल्ह्यात झाला होता. त्यासोबतच यवतमाळ जिल्ह्यातील बाधितांची संख्या एक हजारांच्या पार गेली होती. यावर नियंत्रणासाठी सर्वच स्तरातून यंत्रणांवर दबाव वाढत गेला. 

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री (कै.) पांडुरंग फुंडकर यांच्यासह राज्यमंत्री सदाभाऊ खोत तसेच तत्कालीन कृषी सचिव बिजयकुमार यांना यवतमाळला भेट द्यावी लागली. विशेष बाब म्हणून तेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फवारणी बाधितांवरील उपचारासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला. त्याचवर्षी राज्यात फवारणीमुळे विषबाधितांची संख्या ५२ वर पोचली. सरकारकडून विषबाधित घटनेतील मृतकांना दोन लाख रुपयांची मदत देण्यात येत होती. न्यायालयाच्या आदेशानंतर ती चार लाख करण्यात आली. या घटनेपासून बोध घेत व्यापक जाणीवजागृती अमरावती विभागात केली जात आहे. पाच जिल्ह्यांत बाधित १०२० असून त्यापैकी उपचाराअंती ९१७ जणांना सुटी मिळाली. ७६ जणांवर उपचार सुरू आहेत.

अहवालानंतर कळेल कारण
विषबाधेमुळे दगावलेल्यांची संख्या शून्य असल्याचे शासकीय अहवाल सांगतो. त्याचवेळी अकोला जिल्ह्यात दगावलेल्या दोघांचा व्हिसेरा अहवाल मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आले नाही. यवतमाळ जिल्ह्यातील एका रुग्णाला पुढील उपचारासाठी नागपूरला पाठविण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यातील देखील २७ रुग्णांना इतरत्र उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती आहे. 


इतर ताज्या घडामोडी
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...
सोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपयेसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...
बार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...
`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...
परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...
खानदेशात सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...
खानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...
साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...
नाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...
मराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...
मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...
कांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...
लातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
नांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...
वऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...
शेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...
सिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...
सांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...
निळवंडे धरण तुडुंबअकोले, जि. नगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान...