agriculture news in marathi Amravati division Paisewari of 1289 villages is less | Page 2 ||| Agrowon

अमरावती विभागात १२८९ गावांची पैसेवारी कमी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 नोव्हेंबर 2021

सुधारित पैसेवारीत अमरावती विभागातील १,२८९ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आल्याने त्यांना दुष्काळी स्थितीचा लाभ मिळणार आहे. तर ५,९१८ गावांची पैसेवारी त्यापेक्षा अधिक आहे.

अमरावती : या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी व संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. विभागीय आयुक्तांनी अमरावती विभागाची सुधारित पैसेवारी जाहीर केली असून, ती ५३ पैसे आहे. सुधारित पैसेवारीत विभागातील १,२८९ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आल्याने त्यांना दुष्काळी स्थितीचा लाभ मिळणार आहे. तर ५,९१८ गावांची पैसेवारी त्यापेक्षा अधिक आल्याने दुष्काळाच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.

अमरावती विभागात खरीप हंगामात ३१ लाख ४२ हजार १९६ हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्षात पेरणी झाली होती. एकूण पेरणी क्षेत्राच्या सरासरी ९७ टक्के क्षेत्र पेरणीखाली आहे. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पिकांना अतिवृष्टी व संततधार पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला. महसूल व कृषी विभागाने केलेल्या संयुक्त पंचनाम्यानंतर नुकसानाचे क्षेत्र जाहीर केले आहे. यामध्ये ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना नव्या निकषांप्रमाणे मदतनिधी जाहीर करण्यात आला आहे.

अमरावती विभागात ५ लाख ११ हजार ३७ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याचा संयुक्त अहवाल आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील १ लाख ६५ हजार ७६, अकोल्यातील ३८०५, यवतमाळ १ लाख ७७ हजार ४४७, बुलडाणा १ लाख ३३ हजार ९७२ व वाशीम जिल्ह्यातील ४५ हजार ४८५ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. विभागातील ५ लाख ४६ हजार ५६६ शेतकऱ्यांना या अतिवृष्टी व संततधार पावसाचा फटका बसला आहे.

महसूल विभागाने जाहीर केलेल्या सुधारित पैसेवारीत अमरावती विभागातील ५२ तालुक्यांतील ७ हजार २०७ गावांपैकी १२८९ गावांतच दुष्काळी स्थिती असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे उर्वरित ५ हजार ९१८ गावांना दुष्काळी स्थितीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. खरिपातील एकूण स्थिती व नुकसान बघता शेतकऱ्यांना मोठ्या आशा होत्या; मात्र त्यावर पाणी फेरले गेले आहे.

जिल्हानिहाय ५० पैशांपेक्षा कमी-अधिक असलेली गावांची संख्या...

जिल्हा ५० पैशांपेक्षा कमी ५० पैशांपेक्षा अधिक
अमरावती ३०९ १५६८
अकोला ०० ९९०
यवतमाळ २४ २०२२
वाशीम २२२ ५७१
बुलडाणा ७४२ ६७७
एकूण १२८९ ५९१८

 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये टोमॅटो १६०० रुपये क्विंटलऔरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नारळ पिकावर बोंडर नेस्टिंग पांढरी...डिसेंबर २०११ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील ...
युवकांनी ग्रामीण विकासाचे शिलेदार... नाशिक : ‘‘आधुनिक काळातील युवकांनी उच्च...
पदोन्नतीतील कृषिसहसंचालकात सोलापूरच्या...सोलापूर ः राज्याच्या कृषी विभागाने वर्ग एकमधील...
‘पांडुरंग’चे भालेकर यांना सर्वोत्कृष्ट ...सोलापूर ः मांजरीच्या वसंतदादा शुगर...
नाशिक : डांगसौंदाणे येथे उपबाजार आवार...नाशिक : सटाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील...
पाइप कालव्याद्वारे ६० टक्के पाणी बचत...मालेगाव, जि. नाशिक : दहिकुटे लघू पाटबंधारे...
जळगाव ः भरडधान्य खरेदी खानदेशात रखडतच जळगाव ः  खानदेशात भरडधान्य खरेदी मागील २०...
नांदेडमध्ये खरेदीदारांविरोधात अडत्यांचा...नांदेड : हळद खरेदीदार अडत्यांना दोन...
रब्बीसाठी खानदेशात आवर्तन सुटले गिरणा,...जळगाव ः  खानदेशात विविध प्रकल्पांमधून मागील...
उसाच्या थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांचा...चोपडा, जि.जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर...
परभणी जिल्ह्यात ‘पोकरा’अंतर्गत योजनांचा...परभणी ः जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
कोल्हापूर बाजार समितीत शिवसेनेतर्फे...कोल्हापूर : ‘‘शेतकऱ्यांना बंदुकीची भाषा...
पीकविमा न मिळाल्यास अन्नत्याग आंदोलनऔरंगाबाद: ‘‘आमचा फळपीक विमा  व इतर पिकांचा...
रयत क्रांतीचा बडोदा बँकेवर आक्रोश मोर्चानांदेड : बँक ऑफ बडोदा शाखेकडून मुखेड तालुक्यातील...
सांगली जिल्हा बँकेच्या थकबाकी वसुलीसाठी...सांगली : जिल्हा बँकेची थकबाकी सुमारे ६५० कोटीहून...
मकर संक्रांतीसाठी सांगलीत गुळाची आवक...सांगली : संक्रांतीनिमित्त सांगली बाजार समितीत...
पुणे जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्वपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
शेतकऱ्यांनाही थंडी जाणवते भाऊ!जलालखेडा, जि. नागपूर ः नरखेड तालुक्यात रब्बी...
‘मँगोनेट’ अंतर्गत सात वर्षांत ४, ५६६... रत्नागिरी : हापूसची परदेशात निर्यात होऊन येथील...