agriculture news in Marathi, Amravati in Groundnut per puintal Rs. 5200 | Agrowon

अमरावतीत भुईमूग प्रतिक्‍विंटल ५२०० रुपये 
टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 जून 2019

अमरावती ः स्थानिक बाजार समितीत हंगामातील नव्या भुईमूग शेंगांची आवक सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून भुईमूग बाजारात येत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. मंगळवारी (ता. ४) बाजारात आलेल्या भुईमुगाचे व्यवहार ४५०० ते ५२०० रुपये क्‍विंटलने झाले. भुईमुगाच्या दरात आणखी सुधारणा होईल, अशी अपेक्षा वर्तविली जात आहे. 

अमरावती ः स्थानिक बाजार समितीत हंगामातील नव्या भुईमूग शेंगांची आवक सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून भुईमूग बाजारात येत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. मंगळवारी (ता. ४) बाजारात आलेल्या भुईमुगाचे व्यवहार ४५०० ते ५२०० रुपये क्‍विंटलने झाले. भुईमुगाच्या दरात आणखी सुधारणा होईल, अशी अपेक्षा वर्तविली जात आहे. 

अमरावती बाजार समितीत दुर्गम मेळघाटातून शेतमालाची आवक होते. बाजारात सध्या भुईमुगाची आवक वाढली आहे. ४५०० ते ५२०० असा सरासरी दर भुईमुगाला मंगळवारी मिळाला. बाजारात ज्वारीचीदेखील अल्पशी आवक असल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी १५० क्‍विंटल ज्वारीची आवक झाली. १४०० ते २१०० रुपये असा ज्वारीचा दर होता. १९५० ते २८५० या दराने गव्हाचे व्यवहार झाल्याची माहिती देण्यात आली. 

तुरीच्या दरात काहीशी सुधारणा होत हे दर ५००० ते ५८०० रुपये क्‍विंटलवर पोचले. किरकोळ विक्री दरातील वाढीच्या परिणामी तुरीच्या घाऊक दरातही तेजी आल्याचा अनुभव आहे. मुगाचीदेखील बाजारात १२६ प्रतिक्‍विंटलच्या घरात आवक आहे. ५४०० ते ६३०० रुपये क्‍विंटलचा दर मुगाला मंगळवारी मिळाला. ४३५० ते ४७०० रुपये दराने उडीदाचे व्यवहार झाले.

बाजारात हरभऱ्याचीदेखील ३७४ क्‍विंटलची आवक झाली. हरभऱ्याचे दर ४१५० ते ४२७२ रुपये क्‍विंटल होते. १९५० ते २०५० या दराने मका विकल्या गेला. कापसाच्या दरातही मंगळवारी तेजी अनुभवण्यात आली. कापसाचे ६००० ते ६४५० रुपये क्‍विंटलने व्यवहार झाले.
 

इतर बाजारभाव बातम्या
पितृपंधरवाड्यामुळे पुण्यात भाज्यांना...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...
परभणीत काकडी प्रतिक्विंटल ३०० ते ६००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिकमध्ये गवार २५०० ते ४५०० रूपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात डाळिंब २१०० ते ४८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता....
केळीच्या मध्य प्रदेशातील आवकेत घट;...जळगाव : मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातील...
सोलापुरात वांगी, गवार, भेंडीच्या दरांत...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये लिंबू २५०० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात नवीन गुळाला साडेतीन ते सहा...कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शाहू...
राज्यात घेवडा प्रतिक्विंटल ८०० ते ५५००...सोलापुरात प्रतिक्विंटलला सर्वाधिक ४५०० रुपये...
नाशिकमध्ये वांगी १३०० ते ३००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात वांगी, घेवडा, गवारीच्या दरात...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
उत्तम दर्जाच्या मुगाला ६२५० पर्यंत दरजळगाव  ः खानदेशातील धुळे, जळगाव, साक्री,...
कळमणा बाजारात कांद्याच्या दरात सुधारणानागपूर ः मागणी वाढल्याने कळमणा बाजार समितीत कांदा...
गुलटेकडीत कांदा, लसूण, कोबीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये शेवगा ३००० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात ढोबळी मिरचीला १००० ते ३००० रूपयेपुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
अकोल्यात मूग सरासरी ५६०० रुपये क्विंटलअकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक वाढली, दरही...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
सोलापुरात मिरची, गवार, भेंडीचे दर टिकूनसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...