अमरावती विभागात २८ गावांना ३० टँकरने पाणीपुरवठा

अमरावती विभागात २८ गावांना ३० टँकरने पाणीपुरवठा
अमरावती विभागात २८ गावांना ३० टँकरने पाणीपुरवठा

अकोला ः पावसाळ्यातील तीन महिन्यांचा कालावधी आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आला आहे. असे असतानाही अमरावती विभागातील टँकर मात्र धावतच आहेत. बुलडाण्यात २२ व वाशीम जिल्ह्यात ३ आणि अमरावतीमध्ये पाच टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. एकूण २८ गावांसाठी ३० टँकर धावत आहेत. बुलडाणा जिल्ह्यात २२ टँकर धावत आहेत. या जिल्ह्यांत आत्तापर्यंत वार्षिक सरासरीच्या ७२ टक्के पाऊस झालेला आहे. परंतु, या पावसात अनियमितता राहिल्याने जिल्ह्यातील घाटावरील चार तालुक्यांत पावसाची सरासरी ही इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी आहे. जिल्ह्यांत २० गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. देऊळगावराजा, सिंदखेडराजा या दोन तालुक्यांत सर्वाधिक १४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.  संग्रामपूर तालुक्यात वार्षिक सरासरीच्या १०५ टक्के पाऊस पडूनही या तालुक्यातील दोन गावे टँकरग्रस्त आहेत. संग्रामपूर तालुक्यातील इटखेड आणि पेसोडा या दोन गावांना एका टँकरद्वारे हा पाणीपुरवठा केला जात आहे. या जिल्ह्यात २० गावांमध्ये सध्या २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. वाशीम जिल्ह्यात तीन गावांना ३ टँकरने आणि अमरावती जिल्ह्यात पाच गावांना ५ टँकरने पाणी पुरविले जात आहे. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ८० पेक्षा अधिक टँकर धावत होते. यात बुलडाण्यात ६२ टँकर, अकोल्यात ७ आणि वाशीम ४, अमरावतीत ९ टँकर धावत होते. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे ही संख्या कमी होऊन आता विभागात २८ गावांना ३० टँकरने पाणीपुरवठा करण्यापर्यंत आली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील टँकरग्रस्त गावे नांदुरा तालुक्यातील निमगाव येथे तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील सावरगाव माळ, जागदरी, उमरद, खामगाव, संग्रामपूर तालुक्यांतील इटखेड आणि पेसोडा, चिखली तालुक्यातील असोला बुद्रुक, कोलारा, चंदनपूर आणि देऊळगावराजा तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक, उंबरखेड, चिंचोली बुद्रुक, कुंभारी, नागणगाव, अंभोरा, गिरोली खुर्द, पांग्री, गोळेगाव, आळंद या २० गावांना टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com