Agriculture news in marathi; In the Amravati region, 5 villages supply water to 4 villages | Page 2 ||| Agrowon

अमरावती विभागात २८ गावांना ३० टँकरने पाणीपुरवठा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

अकोला ः पावसाळ्यातील तीन महिन्यांचा कालावधी आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आला आहे. असे असतानाही अमरावती विभागातील टँकर मात्र धावतच आहेत. बुलडाण्यात २२ व वाशीम जिल्ह्यात ३ आणि अमरावतीमध्ये पाच टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. एकूण २८ गावांसाठी ३० टँकर धावत आहेत.

अकोला ः पावसाळ्यातील तीन महिन्यांचा कालावधी आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आला आहे. असे असतानाही अमरावती विभागातील टँकर मात्र धावतच आहेत. बुलडाण्यात २२ व वाशीम जिल्ह्यात ३ आणि अमरावतीमध्ये पाच टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. एकूण २८ गावांसाठी ३० टँकर धावत आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात २२ टँकर धावत आहेत. या जिल्ह्यांत आत्तापर्यंत वार्षिक सरासरीच्या ७२ टक्के पाऊस झालेला आहे. परंतु, या पावसात अनियमितता राहिल्याने जिल्ह्यातील घाटावरील चार तालुक्यांत पावसाची सरासरी ही इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी आहे. जिल्ह्यांत २० गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. देऊळगावराजा, सिंदखेडराजा या दोन तालुक्यांत सर्वाधिक १४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. 
संग्रामपूर तालुक्यात वार्षिक सरासरीच्या १०५ टक्के पाऊस पडूनही या तालुक्यातील दोन गावे टँकरग्रस्त आहेत. संग्रामपूर तालुक्यातील इटखेड आणि पेसोडा या दोन गावांना एका टँकरद्वारे हा पाणीपुरवठा केला जात आहे. या जिल्ह्यात २० गावांमध्ये सध्या २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

वाशीम जिल्ह्यात तीन गावांना ३ टँकरने आणि अमरावती जिल्ह्यात पाच गावांना ५ टँकरने पाणी पुरविले जात आहे. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ८० पेक्षा अधिक टँकर धावत होते. यात बुलडाण्यात ६२ टँकर, अकोल्यात ७ आणि वाशीम ४, अमरावतीत ९ टँकर धावत होते. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे ही संख्या कमी होऊन आता विभागात २८ गावांना ३० टँकरने पाणीपुरवठा करण्यापर्यंत आली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील टँकरग्रस्त गावे
नांदुरा तालुक्यातील निमगाव येथे तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील सावरगाव माळ, जागदरी, उमरद, खामगाव, संग्रामपूर तालुक्यांतील इटखेड आणि पेसोडा, चिखली तालुक्यातील असोला बुद्रुक, कोलारा, चंदनपूर आणि देऊळगावराजा तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक, उंबरखेड, चिंचोली बुद्रुक, कुंभारी, नागणगाव, अंभोरा, गिरोली खुर्द, पांग्री, गोळेगाव, आळंद या २० गावांना टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे.


इतर बातम्या
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
कापसाचे ६४७ कोटींचे चुकारे थकीतअमरावती ः बाजारात दर कोसळल्याने महाराष्ट्र राज्य...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...
‘पणन’ची कापूस खरेदी उच्चांकी दिशेनेऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन...
शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीत ८५ स्वराज्यरथ...पुणे : ‘‘पुण्यात शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आज...
बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांत दहशतअमरावती  ः गावशिवारात एकाच आठवड्यात दोनदा...
पिंपळनेरला कांदा मार्केट दोन मार्चला...पिंपळनेर, जि. धुळे : शेतीमाल विक्रीनंतर...
महिला बचत गट आर्थिक प्रगतीचा मार्ग ः...सोलापूर  ः  महिला बचतगट हे ग्रामीण...
जळगाव जिल्ह्यात रब्बीचा पेरा १७१ टक्केजळगाव  ः रब्बी हंगामातील उत्पादनाची...
वीज बिले न भरण्याचा ‘स्वाभिमानी’चा...सातारा  ः जावळवाडी (ता. सातारा) येथील मुख्य...
कोकणासह नवा महाराष्ट्र घडवूया :...रत्नागिरी  ः आकडा सांगण्यापेक्षा कृतीला...
कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी आता...नाशिक  : केंद्र सरकारने निर्यातबंदी केल्याने...
भाजपचे राज्यात २५ ला धरणे आंदोलन :...मुंबई : भारतीय जनता पक्ष येत्या मंगळवारी (ता. २५...
सांगलीत साडेसहा हजार शेतीपंपांच्या वीज...सांगली  ः  जिल्ह्यातील २०१८ पूर्वीच्या...
‘वनामकृवि’त सोयाबीनच्या पैदासकार ...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...
बोंडारवाडी धरणप्रश्नी मेढा येथे आंदोलनमेढा, जि. सातारा : बोंडारवाडी धरण झालेच पाहिजे,...
कापूस उद्योगाचे चीनमध्ये पाच हजार कोटी...जळगाव ः देशातील सूत व कापूस गाठींचा मोठा खरेदीदार...
ज्वारी उत्पादन यंदाही आतबट्ट्यातचनगर ः दोन वर्षं दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर यंदा...
जांभुळणी तलावाच्या कालव्याला गळतीखरसुंडी, जि. सांगली : जांभुळणी (ता. आटपाडी) येथील...