अमरावतीत पाणीटंचाईची ६६९ गावांमध्ये वाढली दाहकता

अमरावती ः माॅन्सूनचे आगमन की दिवसांवर असतानाच जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. जिल्ह्यातील ६६९ गावांना कमी अधिक प्रमाणात पाणीटंचाईची झळ पोचली असून त्यातील ११ गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
In Amravati, water scarcity increased in 669 villages
In Amravati, water scarcity increased in 669 villages

अमरावती ः माॅन्सूनचे आगमन की दिवसांवर असतानाच जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. जिल्ह्यातील ६६९ गावांना कमी अधिक प्रमाणात पाणीटंचाईची झळ पोचली असून त्यातील ११ गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गेल्यावर्षी सुरुवातीला अनेक गावांमध्ये सरासरी इतकाही पाऊस झाला नाही. त्यामुळे चिंता वाढली होती. त्यानंतर आठ तालुक्‍यांत पावसाने सरासरी भरून काढली. चार तालुक्‍यांत सरासरीच्या काठावर तर दोन तालुक्‍यांत सरासरी इतका पाऊस झालाच नाही. त्यानंतर एप्रिल अखेर भूजलस्तर कमी झाला आहे. अनेक गावातील जलस्त्रोत आटले. असे असताना पाणीटंचाई निवारणार्थ असलेल्या २४० योजनांना अद्यापही सुरुवात झाली नसल्याचे वास्तव आहे.

सद्यःस्थितीत तहानलेल्या ११ गावांमध्ये टॅंकरव्दारे पाणीपुरवठा होत आहे. जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणार्थ असलेल्या कृती आराखड्यात १४८८ गावांसाठी १६६९ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यावर २१ कोटी ६८ लाख ९५ हजार रुपये खर्च प्रस्तावित आहे. या आराखड्याच्या एप्रिल ते जून या तिसऱ्या टप्प्यासाठी ६६९ गावांमध्ये पाणीटंचाई राहणार हे गृहीत धरून ७५६ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यासाठी ७ कोटी ८२ लाख ७० हजार रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला होता.

प्रत्यक्षात यात २३१ गावांमध्ये २५१ विंधन विहिरींसाठी २.४३ कोटी. ७७ गावांमध्ये ७७ नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीवर २.२६ कोटी. २३ गावातील २३ तात्पुरत्या नळयोजनांसाठी ६४ लाख. २१ गावात टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ६३ लाख. १११ गावातील १४१ विहिरी खोल करणे व गाळ काढणे यावर ४४.७० लाख. २०६ गावातील २३५ खासगी विहिरींचे अधिग्रहणावर १.१ कोटी अशी एकूण ७.५६ कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

कामे राहिली कागदावर

  • नळयोजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी १८५ उपाययोजना प्रस्तावित. १२६ कामांना मंजुरी मात्र एकही काम सुरू नाही.
  • तात्पुरत्या पूरक नळयोजना ७० प्रस्तावित. २४ ला मंजुरी पण एकही काम सुरू नाही.
  • ६७ टॅंकर प्रस्तावित त्यापैकी १२ सुरू.
  • ५०९ पैकी २७५ विहिरी अधिग्रहण प्रस्तावांना मंजुरी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com