Agriculture news in Marathi Amravati ZP official Will give two months fund | Agrowon

अमरावती ‘झेडपी’चे पदाधिकारी देणार दोन महिन्यांचे मानधन 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 एप्रिल 2020

अमरावती : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनपातळीवर उपायांवर भर दिला गेला आहे. त्यात खारीचा वाटा उचलत जिल्हा परिषद पदाधिकारी व काही सदस्यांनी दोन महिन्यांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. 

अमरावती : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनपातळीवर उपायांवर भर दिला गेला आहे. त्यात खारीचा वाटा उचलत जिल्हा परिषद पदाधिकारी व काही सदस्यांनी दोन महिन्यांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. 

‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यासोबतच केंद्र सरकार, राज्य सरकारच्या पातळीवर वैद्यकीय सुविधांच्या उभारणीसाठी मदतीचे आवाहन देखील केले गेले आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, बांधकाम व शिक्षण समिती सभापती प्रियंका दगडकर, आरोग्य व वित्त सभापती बाळसाहेब हिंगणीकर, समाज कल्याण सभापती दयाराम काळे, महिला व बालकल्याण सभापती पूजा आमले यांच्यासह ज्येष्ठ महिला सदस्य सुहासिनी ढेपे यांनी आपले दोन महिन्यांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याचा निर्णय घेतला आहे. या आशयाचे पत्र त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांना दिले. 

विरोधी पक्षनेते रवींद्र मुंदे यांनीही आपले दोन महिन्यांचे मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. पदाधिकाऱ्यांनी मदत करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे कौतूक होत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील शासनाला आर्थिक मदत करावी, असे आवाहन बबलू देशमुख यांनी केले. 


इतर ताज्या घडामोडी
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...
अकोटमध्ये अतिवृष्टीने कपाशी पाण्याखालीअकोला ः आजवर झालेल्या सततच्या पावसाने अकोट...
बुलडाण्यातील नुकसानीचे पंचनामे करून...बुलडाणा : पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे...
सातगाव पठारावर नुकसानग्रस्त बटाट्याचे...पुणे :‘‘लांबलेला मॉन्सून, सततचा कोसळणारा वादळी...
गाव पातळीवरील बैठका, सभा तात्पुरती...अकोला ः कोवीड १९ च्या वाढत्या प्रभावामुळे गाव...
नोकर भरतीची वयोमर्यादा वाढवाः...चंद्रपूर : कोरोना संकटामुळे या वर्षात नोकरीकरता...
लातूर, उस्मानाबादेत एक लाख ४१ हजार...उस्मानाबाद / लातूर : लातूर व उस्मानाबाद...
औरंगाबाद, जालन्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड...
मजुरांना कष्टाचे तरी पैसे मिळावेत नगर ः राज्यातील साखर कारखान्यांची तब्बल ८० हजार...
पोषक चाऱ्यासाठी ओट लागवडजनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी अधिक पोषणमूल्य...
राज्यात सोयाबीन २५०० ते ३९७४ रुपये नगरमध्ये ३००० ते ३७०० रुपये  नगर येथील...
कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पीक नियोजनकोरडवाहू  भागातील जमिनीतील ओलावा हा...
हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी फुले...महात्मा फुले कृषि विदयापिठाने कंबाईन हार्वेस्टरने...
मानवी आहारासाठी पोषणयुक्त जैवसंपृक्त वाणजैवसंपृक्त पिकांची लागवड केल्यास पौष्टिक व...
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...