Agriculture news in Marathi Amrawati in Bullock cart with farmers agitation | Agrowon

अधिकारी कार्यालयात घुसवल्या बैलजोड्या

टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 डिसेंबर 2019

अमरावती ः वारंवार अर्ज, विनंत्या करूनसुद्धा पांदण रस्त्याच्या कामात दिरंगाई होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी थेट अमरावती उपविभागीय अधिकारी कार्यालयात बैल घुसविल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर बैल कार्यालयाबाहेर नेण्यात आले.

अमरावती ः वारंवार अर्ज, विनंत्या करूनसुद्धा पांदण रस्त्याच्या कामात दिरंगाई होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी थेट अमरावती उपविभागीय अधिकारी कार्यालयात बैल घुसविल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर बैल कार्यालयाबाहेर नेण्यात आले.

जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या वर्षी अतिपावसामुळे पांदण रस्त्यांची पुरती दुरवस्था झाली आहे. शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक, तसेच रब्बी हंगामातील निविष्ठांची ने-आण करणे यामुळे अडचणीचे ठरत आहे. दुसरीकडे प्रशासनाकडून मात्र पांदण रस्ते विकास योजनांचा प्रचंड गाजावाजा करण्यात येत आहे. अशी विरोधाभासी स्थिती असल्याने यात बदल व्हावा याकरिता शेतकऱ्यांनी यापूर्वी धरणे दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्यासोबत आणलेल्या बैलजोड्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कक्षात घुसविण्याचा प्रयत्न सुरू केला. 

उपस्थित पोलिसांनी त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यश आले नसल्याने शेतकरी थेट बैलजोड्या घेऊन एसडीओ कक्षात दाखल झाले. चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात बाळकृष्ण धर्माळे, राजेंद्र उमेकर, समीर जवंजाळ, राजेश बनारसे, राजू लोखंडे, नवनीत उमेकर, सचिव अढावू, वैभव डवरे, सूर्यभान पारिसे, भीमराव मेश्राम, विजय वाकेकर, विश्‍वास डुकरे, रवींद्र समरीत, उमेश घाटे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पांदण रस्त्यांची कामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून होणाऱ्या या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
- प्रकाश साबळे, जिल्हा परिषद सदस्य


इतर ताज्या घडामोडी
बुलडाणा : कांद्याचे निकृष्ट बियाणे...बुलडाणा : मध्यंतरीच्या काळात कांद्याच्या...
रब्बीसाठी पहिले आवर्तन पाच डिसेंबरला ः...जळगाव : ‘‘रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून तीन...
धुळे जिल्ह्यातील रब्बी क्षेत्रात होणार...कापडणे, जि. धुळे : जिल्ह्यात खरीप हंगामात पावसाने...
कुंभार पिंपळगावात आगीत चार एकर ऊस खाककुंभार पिंपळगाव, जि.जालना : राजाटाकळी- अरगडे...
द्राक्ष निर्यातवाढीसाठी शासन सहकार्य...अंतापूर, ता. सटाणा : ‘‘द्राक्षाचा पीकविमा बाराही...
कपाशी पिकातील फरदड घेणे टाळा : डॉ. पवारअंबड, जि. जालना : ‘‘मराठवाड्यात कपाशीच्या...
मेथी उत्पादनाचा खर्च ४४०० आणि मिळाले...येवला  : महिन्यापूर्वी २५ ते ३० रुपयांना...
कृषिपंपांसाठी दिवसा वीजपुरवठा करा; `...नाशिक : ‘‘रात्रीच्या वेळी पाणी देताना होणारी...
सांगलीत जनावरांचे ई-टॅगिंग रखडणारसांगली (प्रतिनिधी) : तासगाव तालुक्‍यातील तब्बल...
नांदेड जिल्ह्यात सुरळीत विजेअभावी...नांदेड : खरिपात झालेली नुकसानभरपाई रब्बी हंगामात...
परभणी, हिंगोली जिल्ह्यातील नऊ...परभणी : यंदाच्या हंगामात परभणी जिल्ह्यातील पाच,...
अतिवृष्टीची ६३ लाखांची नुकसान भरपाई जमानवेखेड, जि. सांगली  : वाळवा तालुक्यात...
आंदोलनात हरियानाचे शेतकरी नाहीत :...चंडीगड  : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी...
शॉर्टसर्किटमुळे आग; आंब्याच्या झाडांचे...रत्नागिरी  : तालुक्यातील नाखरे मुंगणेकरवाडी...
तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा...अकोला : तुरीच्या पिकावर सध्या शेंगा...
ग्रामसभेला जादा अधिकार हवेतनगर (प्रतिनिधी) : लोकशाहीच्या यशस्वितेसाठी,...
कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरा :...पुणे : नव्या केंद्रीय कृषी कायद्यांचा परिणाम...
सांगलीत नुकसानग्रस्तांना तोकडी मदत सांगली ः शासनाने डाळिंबाला प्रति हेक्टरी २५ हजार...
शेतकऱ्यांना दिलेल्या वचनांचे पालन नाही...मुंबई : मुख्यमंत्री पदाचे न दिलेले वचन त्यांना...
खानदेशात पूर्वहंगामी कापसाखालील ७०...जळगाव ः खानदेशात कापूस प्रमुख पीक आहे. त्यात...