धुळे : अमरिश पटेल यांचा बिनविरोधसाठी प्रयत्न

हुचर्चित धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची १७ जागांसाठीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होण्यासाठी धुळे जिल्ह्यातून महत्प्रयत्न सुरू आहेत. यात महाआघाडी व भाजपतर्फे सर्वाधिकार माजी शालेय शिक्षणमंत्री तथा विधान परिषदेचे आमदार अमरिश पटेल यांना बहाल झाले आहेत.
अमरिश पटेल यांचा बिनविरोधसाठी प्रयत्न Of Amrish Patel Efforts for unopposed
अमरिश पटेल यांचा बिनविरोधसाठी प्रयत्न Of Amrish Patel Efforts for unopposed

धुळे : बहुचर्चित धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची १७ जागांसाठीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होण्यासाठी धुळे जिल्ह्यातून महत्प्रयत्न सुरू आहेत. यात महाआघाडी व भाजपतर्फे सर्वाधिकार माजी शालेय शिक्षणमंत्री तथा विधान परिषदेचे आमदार अमरिश पटेल यांना बहाल झाले आहेत. यंदा बँकेचे अध्यक्षपद नंदुरबार जिल्ह्याला मिळावे, अशी शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नंदुरबारमधील काही नेत्यांची इच्छा आहे. ती किती फळास येते याकडे सर्वांचे लक्ष असेल.  जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रथम जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यासह सर्वपक्षीय पॅनलचा प्रयत्न झाला. नंतर त्यातून काँग्रेसने माघार घेतल्याने तेथे भाजपविरोधात इतर विरोधक एकत्र आले. या धर्तीवर धुळे जिल्ह्यातूनही जिल्हा बँकेची स्थानिक निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रस्ताव मांडला गेला. जळगाव इतकी प्रमुख राजकीय पक्षांची आक्रमकता धुळे व नंदुरबार जिल्ह्यात दिसून येत नसल्याने ही निवडणूक येथे बिनविरोध होण्याची अटकळ बांधली जात आहे. 

राजकीय चिमटे अन्‌ कोटी सहा दिवसांपूर्वी निवडणूक जाहीर होण्यावेळी धुळे शहरात प्रमुख पक्षांचे नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात धुळे जिल्ह्यातून भाजप व महाविकास आघाडीचे मिळून सर्वपक्षीय पॅनलद्वारे जागा बिनविरोध होण्यास कुठलाही अडसर नसल्याचा दावा झाला होता. या बाबत नंदुरबार जिल्ह्यातूनही विरोध होऊ नये म्हणून प्रयत्न केले जावेत, असे सुचविले होते. धुळ्यातील निवडणुकीबाबत विविध पक्षीय सर्वाधिकार अमरिश पटेल यांना बहाल केले आहेत. ते बिनविरोध निवडणूक, अशी अटकळ आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com