Agriculture News in Marathi Of Amrish Patel Efforts for unopposed | Page 3 ||| Agrowon

धुळे : अमरिश पटेल यांचा बिनविरोधसाठी प्रयत्न

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 ऑक्टोबर 2021

हुचर्चित धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची १७ जागांसाठीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होण्यासाठी धुळे जिल्ह्यातून महत्प्रयत्न सुरू आहेत. यात महाआघाडी व भाजपतर्फे सर्वाधिकार माजी शालेय शिक्षणमंत्री तथा विधान परिषदेचे आमदार अमरिश पटेल यांना बहाल झाले आहेत.

धुळे : बहुचर्चित धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची १७ जागांसाठीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होण्यासाठी धुळे जिल्ह्यातून महत्प्रयत्न सुरू आहेत. यात महाआघाडी व भाजपतर्फे सर्वाधिकार माजी शालेय शिक्षणमंत्री तथा विधान परिषदेचे आमदार अमरिश पटेल यांना बहाल झाले आहेत. यंदा बँकेचे अध्यक्षपद नंदुरबार जिल्ह्याला मिळावे, अशी शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नंदुरबारमधील काही नेत्यांची इच्छा आहे. ती किती फळास येते याकडे सर्वांचे लक्ष असेल. 

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रथम जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यासह सर्वपक्षीय पॅनलचा प्रयत्न झाला. नंतर त्यातून काँग्रेसने माघार घेतल्याने तेथे भाजपविरोधात इतर विरोधक एकत्र आले. या धर्तीवर धुळे जिल्ह्यातूनही जिल्हा बँकेची स्थानिक निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रस्ताव मांडला गेला. जळगाव इतकी प्रमुख राजकीय पक्षांची आक्रमकता धुळे व नंदुरबार जिल्ह्यात दिसून येत नसल्याने ही निवडणूक येथे बिनविरोध होण्याची अटकळ बांधली जात आहे. 

राजकीय चिमटे अन्‌ कोटी
सहा दिवसांपूर्वी निवडणूक जाहीर होण्यावेळी धुळे शहरात प्रमुख पक्षांचे नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात धुळे जिल्ह्यातून भाजप व महाविकास आघाडीचे मिळून सर्वपक्षीय पॅनलद्वारे जागा बिनविरोध होण्यास कुठलाही अडसर नसल्याचा दावा झाला होता. या बाबत नंदुरबार जिल्ह्यातूनही विरोध होऊ नये म्हणून प्रयत्न केले जावेत, असे सुचविले होते. धुळ्यातील निवडणुकीबाबत विविध पक्षीय सर्वाधिकार अमरिश पटेल यांना बहाल केले आहेत. ते बिनविरोध निवडणूक, अशी अटकळ आहे.
 


इतर बातम्या
माण तालुक्यात द्राक्ष शेतीचे पावसामुळे...कुकुडवाड, जि. सातारा : मागील आठवड्यात सलग आठवडाभर...
हापूस आंब्याचा हंगाम धोक्यातरत्नागिरी ः कोरोनातील बिकट परिस्थितीचा सामना करत...
‘इटियाडोह’च्या पाण्यासाठी बेमुदत...गोंदिया ः रब्बीत २४ किलोमीटरपर्यंत इटियाडोह...
काटेपूर्णा प्रकल्पावरून रब्बीसाठी पाणी...अकोला ः जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पातून या...
नांदेड जिल्ह्यात रब्बी हंगाम धोक्यातनांदेड : जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून सतत...
हर्षवर्धन पाटलांच्या धरणे आंदोलनाची...इंदापूर, जि. पुणे ः भाजप नेते हर्षवर्धन पाटील...
पुणे बाजार समितीत ‘डमी’ अडत्यांचा...पुणे ः बाजार समितीच्या मुळ उद्देशालाच हरताळ...
नगरमध्ये कोथिंबीर, मेथीची आवक वाढलीनगर, ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
शासन व ग्रामपंचायतीच्या समन्वयातून...नाशिक: ग्रामीण भागात विविध योजना व संकल्पनांची...
ई- पीकपाहणीत जळगाव अव्वल ! जळगाव : राज्यातील पहिल्याच ई- पीकपाहणी प्रकल्पाचा...
कव्हेतील डाळिंब बागेची सोलापूर डाळिंब... सोलापूर ः माढा तालुक्यातील कव्हे (ता.माढा)...
 खानदेशात रब्बीची ४० टक्के पेरणी जळगाव ः  खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची...
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या ...सोलापूर ः राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर २०२१ ते...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : राज्याच्या किमान तापमानाचा पारा १५...
धुळीमुळे शेतकऱ्यांचे ‘पांढरे सोने’...गुमगाव, जि. नागपूर : कोतेवाडा, सोंडेपार शिवारातील...
तांदूळ महागणार ; अवकाळी पावसामुळे...नागपूर : नवीन तांदळाच्या हंगामास सुरुवात झाली आहे...
कामे पूर्ण केलेल्या शेतकरी गटांचे ...पुणेः समूह शेती योजनेत भाग घेतलेल्या शेतकरी...
अनुदान वितरणासाठीची नवी प्रणाली सर्वत्र...पुणे ः कृषी योजनांसाठी दिलेल्या निधीचा उपयोग...
 पन्नास एकरांवर शुगरबीट लागवड कोल्हापूर : महापुराने अस्वस्थ झालेल्या शेतकऱ्याला...
कांडली ग्रामपंचायतीची सौरऊर्जेतून...अमरावती ः अचलपूर पंचायत समितीअंतर्गत कांडली...