agriculture news in Marathi Anganwadi child will get food to home Maharashtra | Agrowon

अंगणवाडीतील बालकांना घरपोच पोषण आहार

टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 मार्च 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालयांसह अंगणवाड्याही बंद ठेवण्यात आल्या आहेत.

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालयांसह अंगणवाड्याही बंद ठेवण्यात आल्या आहेत. अंगणवाडी केंद्रातील तीन ते सहा वयोगटातील बालकांना घरपोच पोषण आहार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बालकांना २० मार्च ते १५ मेपर्यंतचा आहार घरपोच देण्याचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी करावे, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाड्या पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र बालकांना अंगणवाडीत एकत्रित बसून गरम ताजा आहार यापूर्वी देण्यात येत होता. परंतु एकत्र बसल्याने साथीचा प्रादुर्भाव होऊ शकतो म्हणून तेथे आहार देऊ नये, तसेच अंगणवाड्यांचे कामकाज पूर्णपणे बंद न ठेवता या बालकांना घरपोच आहाराचे वाटप करण्यात यावे, अशा सूचना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील प्रकल्पांमधील अंगणवाडी केंद्रावर आहार पुरविण्यात येणार आहे. 

जिल्ह्यातील ३ ते ६ वयोगटातील १ लाख ३ हजार ७४९ लाभार्थी विद्यार्थ्यांना घरपोच आहार देण्याचे नियोजन आहे. घरपोच देण्यात येणाऱ्या आहारामध्ये हरभरा, मसूरडाळ, तांदूळ, गहू, मिरची पावडर, हळद पावडर, मीठ पॅकिंग स्वरूपात देण्यात येणार आहे. 

आहाराचे वाटप करताना मालाचा उत्पादन दिनांक तसेच माल वापरत असल्याचा कालावधी तपासून पुरवठा करावा, धान्य वजनकाट्यावर मोजून घ्यावे, वितरणाच्या कार्यवाहीनंतर उपयोगिता प्रमाणपत्र सादर करावे, पुरवठ्यात तफावत असल्यास व मालाचा दर्जा नसल्यास स्वीकारू नये, मागणीनुसार पुरवठा नसेल तर देयकातून रक्कम वसूल करावी, अंगणवाडी अथवा बचत गटामार्फत पुरवण्यात येणारा गरम ताजा आहार तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


इतर अॅग्रो विशेष
उद्योजकांच्या कर्जमाफीवर सर्वांचीच...भारतात शेती आणि शेतकरी याला खूप महत्त्व आहे....
खरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...
ऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...
‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...
मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबला पुणे : देशभरात गेले तीन ते चार महिने समाधानकारक...
राज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु काही...
पपईला अतिपावसाचा फटका जळगाव ः अतिपावसात खानदेशात पपईचे पीक खराब झाले...
कृषी विधेयकांविरोधात आज ‘भारत बंद’ नगर/कोल्हापूर: केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...
कपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....
हलका ते मध्यम पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन...
कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावरचंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी...
नाशिकमध्ये खरीप कांदा लागवडी बुरशीजन्य...नाशिक: खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडी पूर्ण...
कुलगुरू निवडीचे निकष ऐरणीवर पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये...
काजू बागायतदारांना गंडा घालणाऱ्या...सिंधुदुर्ग: काजू बागायतदारांना जादा दराचे आमिष...
सोयाबीन ठरेल ‘मॅजिकबीन’ नागपूर: देशात यावर्षी सोयाबीन खालील क्षेत्रात घट...
ऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...