नाशिक जिल्ह्यात संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव रोखले

Onion, export, onion export, kanda, Kanda niryant, Niryat bandi,  कांदा, कांदा निर्यात बंदी, लासलगाव, शेतकरी
Onion, export, onion export, kanda, Kanda niryant, Niryat bandi, कांदा, कांदा निर्यात बंदी, लासलगाव, शेतकरी

नाशिक : जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सकाळच्या सत्रात कांदा लिलाव सुरू झाल्यानंतर लिलावाच्या बोलीत दर कमी झाल्यामुळे  शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत लिलाव बंद पाडले. लासलगाव, विंचूर, येवला, देवळा, सटाणा, उमराणे, मनमाड, पिंपळगाव बसवंत येथेही शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे. कांदा निर्यातबंदी उठविण्याच्या व रास्त दर मिळेपर्यंत लिलाव बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.  

लासलगाव (ता.निफाड) राज्य कांदा उत्पादकांच्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भारत दिघोळे यांच्यासह विविध शेतकरी संघटना व संतप्त कांदा उत्पादकांनी कांदा लिलाव बंद पाडले. जिल्ह्यातील बाजारात मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक वाढली आहे. मात्र अशा परिस्थितीत केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी मागील वर्षाच्या तुलनेत मार्च महिन्यात आवक वाढणार असल्याने ट्विटरद्वारे कांदा निर्यातबंदी उठविल्यासंबंधी संकेत दिले. मात्र अधिसूचना जाहीर नसल्याने गेल्या तीन दिवसांपासून बाजारात संभ्रम व दरात चढ उतार सुरूच आहे.

लासलगाव येथील कांदा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर कांदा आवक होऊन सकाळच्या सत्रात लिलाव झाले. त्यात 1652 उच्चांकी तर भाव 1400 रुपये सरासरी दर जाहीर होताच हे लिलाव बंद पाडण्यात आले. मंत्र्यांनी ट्विटद्वारे घोषणा केली, मात्र अजूनही निर्यातबंदी हटविली गेली नाही,  सरकारचे हे धरसोडीचे धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर असल्याची टीका यावेळी भारत दिघोळे यांनी केली.

आज केंद्रीय मंत्री पासवान यांनी ट्विट करून सहा दिवस झाले तरी केंद्र सरकार निर्णय का घेत नाही? कांदा उत्पादक पट्ट्यातील लोकप्रतिनिधी खासदार डॉ. भारती पवार, सुभाष भामरे व हेमंत गोडसे हे केंद्राकडे मागणी का करत नाही ? यावर तातडीने लक्ष घालावे असे सुचवून जोपर्यंत कांदा निर्यातबंदी उठवली जात नाही. तोपर्यंत नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार पेठेत कांदा लिलाव होऊ देणार नाही, असे दिघोळे यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com