यवतमाळच्या अनिकेतने तयार केला फवारणीचा रोबोट

रोबोट निर्मिती
रोबोट निर्मिती

यवतमाळ ः फवारणीमुळे होणाऱ्या विषबाधा सर्वदूर चिंतेचा विषय झाला असतानाच जिल्ह्यातीलच नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने त्यावर रोबोटचा पर्याय शोधून काढला आहे. अवघ्या २५ हजार रुपयांत हा रोबोट तयार होत असल्याचा दावा करण्यात आला असून जपानमधील एका विज्ञान प्रदर्शनाकरिता देखील या मॉडेलची निवड झाली आहे.  येथील अनिकेत काकडे याने सहावीत असताना रोबोटेक्‍स तंत्रज्ञान संदर्भात एका कार्यशाळेला हजेरी लावली होती. त्यानंतर अशाप्रकारच्या तंत्रज्ञानाविषयी उत्सुकता वाढल्याने त्यातूनच त्याने एक रोबोटही तयार केला. मोबाईलवरून त्याचे कंट्रोलिंग होत होते. त्याचवेळी फवारणी दरम्यान विषबाधा होत शेतकरी, शेतमजुरांचे जीव गेल्याचे त्याच्‍या वाचनात आले. त्यामुळे स्वयंचलित फवारणी यंत्र विकसित करण्याचा निर्णय घेतला. ॲन्ड्रॉईड मोबाईलच्या माध्यमातून तो ऑपरेट होतो. एकवेळ चार्जिंग केल्यानंतर तो तीन ते चार तास काम करतो. त्याकरिता त्याला बॅटरी देण्यात आली आहे. बगीच्यात फवारणी करू शकतो. रुम क्‍लिनिंग, स्प्रे पेटिंग, माती परिक्षणाचा उद्देशही या माध्यमातून करता येईल. मातीमधील ओलावा तपासण्याचे कामदेखील हा रोबोट करतो. या रोबोट फवारणी यंत्राची क्षमता दीड ते दोन लिटरची आहे. २५ हजार रुपयांत हा मिनी रोबोट तयार होतो.   जळगाव येथील राज्य पातळीवरील इन्स्पायर प्रदर्शनातील सहभागानंतर राष्ट्रीय पातळीवरील इन्स्पायर अवार्डकरिता अनिकेतच्या मॉडेलची निवड झाली. त्यापूर्वी असे संशोधन करणाऱ्या राज्यभरातील बाल संशोधकांना आयआयटी मुुंबईच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. डिपार्टमेंट ऑफ सायन्स टेक्‍नॉलॉजीचे सचिव डॉ. संजय मिश्रा यांनीदेखील या संशोधनाचे कौतुक केले. परंतु, त्यानंतर या संशोधनाची निवड इन्स्पायर अॅवाॅर्डकरिता होऊ शकली नाही. मात्र जपानला सकुरा सायन्स फेअरसाठी केंद्र सरकारने या संशोधनाची निवड केली. परंतु त्याकरिता स्पर्धकाने वयाची १५ वर्ष पूर्ण करणे गरजेचे आहे. आज अनिकेत १४ वर्षांचा आहे. पुढील वर्षी त्याचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचणार आहे. दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासोबतच यवतमाळ येथे कृषी विभागाच्या महोत्सवात देखील हे मॉडेल मांडण्यात आले. त्याचे अनेकांनी कौतुक केले होते. त्यामध्ये डॉ. एस. पी. राऊत, पालकमंत्री मदन येरावार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा समावेश आहे. या संशोधनाला मान्यता मिळावी, याकरिता एन्फोसीस नावाचे स्टार्टअप अनिकेतने सुरू केले आहे. त्याद्वारे शेतकरी, ग्रामीण भागातील युवकांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. विद्यार्थ्यांमधूनच उद्योजक घडावे याकरिता कार्यशाळा घेण्याचा मनोदय आहे.  आता होणार प्रात्यक्षिक सध्या हा प्रोटोटाईप असून सावर येथील प्रमोद डफे यांच्‍या शेतात लवकरच रोबोट फवारणी यंत्राचे प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे. प्रशांत मनोहर काकडे, आई अंबिका प्रशांत काकडे यांचे या कामात सहकार्य त्याला लाभले. शेतकरी नेते मनिष जाधव यांनी त्याचे कौतुक केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com