agriculture news in marathi, Anil Bonde will be Agriculture minister for state | Agrowon

खातेवाटप जाहीर : अनिल बोंडे कृषिमंत्री; क्षीरसागर फलोत्पादन, रोजगार हमी मंत्री
वृत्तसेवा
रविवार, 16 जून 2019

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज (रविवार) पार पडला. त्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर झाले. यामध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांना गृहनिर्माण तर अनिल बोंडे यांना कृषिमंत्रिपद देण्यात आले. तर आशिष शेलार यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. 

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज (रविवार) पार पडला. त्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर झाले. यामध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांना गृहनिर्माण तर अनिल बोंडे यांना कृषिमंत्रिपद देण्यात आले. तर आशिष शेलार यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. 

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाकडून अविनाश महातेकर यांच्यासह तेरा जणांनी मंत्री आणि राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज सकाळी अकरा वाजता नव्या मंत्र्यांना शपथ दिली. शिवसेना-भाजपचे मिळून एकूण 13 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीआधी होणारा हा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार आहे. 

यामध्ये तानाजी सावंत यांना जलसंधारण, सुरेश खाडे यांना सामाजिक न्याय मंत्रिपद देण्यात आले आहे. तर जयकुमार रावल यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार मंत्रिपद देण्यात आले. 

मंत्रिमंडळ खातेवाटप पुढीलप्रमाणे :
कॅबिनेट मंत्री 

  1. राधाकृष्ण विखे पाटील - गृहनिर्माण
  2. जयदत्त क्षीरसागर - रोजगार हमी व फलोत्पादन
  3. आशिष शेलार - शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
  4. संजय कुटे - कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग कल्याण
  5. सुरेश खाडे - सामाजिक न्याय
  6. अनिल बोंडे - कृषी
  7. अशोक उईके - आदिवासी विकास
  8. तानाजी सावंत - जलसंधारण
  9. राम शिंदे - पणन व वस्त्रोद्योग
  10. संभाजी पाटील निलंगेकर - अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास, माजी सैनिकांचे कल्याण
  11. जयकुमार रावल - अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार
  12. सुभाष देशमुख - सहकार, मदत व पुनर्वसन

राज्यमंत्री

  1. योगेश सागर - नगरविकास
  2. अविनाश महातेकर - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
  3. संजय (बाळा) भेगडे - कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन
  4. परिणय फुके - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), वने, आदिवासी विकास
  5. अतुल सावे - उद्योग आणि खणिकर्म, अल्पसंख्याक विकास व वक्फ

इतर बातम्या
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
यवतमाळ जिल्ह्यातील सात दुष्काळग्रस्त...यवतमाळ ः जनरेट्यामुळे दुष्काळ यादीत नव्याने...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...