अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, ‘सीबीआय’चे छापे

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी (ता.२४) सकाळी अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयने छापे टाकले.
अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, ‘सीबीआय’चे छापे On Anil Deshmukh Crimes filed, CBI raids
अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, ‘सीबीआय’चे छापे On Anil Deshmukh Crimes filed, CBI raids

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना पदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर त्यांच्यावर करण्यात आलेल्या शंभर कोटी रुपयांच्या आरोपाची ‘सीबीआय’ने चौकशी केली. शनिवारी (ता.२४) सकाळी अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयने छापे टाकले.

अनिल देशमुख यांच्या मुंबईतील घरासह बांद्रा, वरळी, तसेच नागपूर येथील दहा ठिकाणी छापे टाकले.  सीबीआयने चौकशी केल्यानंतर दिल्लीमध्ये अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

वाझे यांच्यामार्फत महिन्याला शंभर कोटी रुपये वसुली करण्याचे आदेश दिल्याचा खळबळजनक आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. पहिल्यांदाच एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून थेट गृहमंत्र्यांवर वसुलीचा आरोप झाल्यामुळे सरकारला अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा लागला. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते. न्यायालयाने याप्रकरणी सीबीआय चौकशीचा आदेश दिला होता. त्यानुसार, सीबीआयने पंधरा दिवसानंतर अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच मुंबईसह राज्यातील दहा ठिकाणी घर आणि मालमत्तांवर छापेमारी केली आहे.

२५ फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर एका कारमध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्या होत्या. काही दिवसांनी कारचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणात मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे अडकल्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागले. विरोधी पक्षांनी विधानसभेत आणि बाहेरही हा मुद्दा उचलून धरत, कारवाईची मागणी केली. राज्य सरकारने याची गंभीर दखल घेऊन मुंबई पोलिस आयुक्त पदावरून परमबीर सिंह यांना हटविले. त्यांच्या जागी पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com