agriculture news in marathi Anil Jain honoured by Global Excellence Award | Page 2 ||| Agrowon

ग्लोबल एक्सलन्स ॲवॉर्डने अनिल जैन यांचा गौरव

टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 ऑगस्ट 2021

पाणी क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल ‘एनर्जी अँड एन्व्हायर्न्मेंट फाउंडेशनतर्फे ‘ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड’ येथील जैन इरिगेशन सिस्टिम्स ली.चे उपाध्यक्ष अनिल जैन यांना नुकताच प्रदान करण्यात आला.

जळगाव : पाणी क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल ‘एनर्जी अँड एन्व्हायर्न्मेंट फाउंडेशनतर्फे ‘ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड’ येथील जैन इरिगेशन सिस्टिम्स ली.चे उपाध्यक्ष अनिल जैन यांना नुकताच प्रदान करण्यात आला.

फाउंडेशनने दोन दिवसांची पाचवी जागतिक जलशिखर परिषद आयोजिली होती. जैन इरिगेशनच्या पर्यावरण व पाण्याच्या संदर्भात केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याला अधोरेखित करून हा जागतिक पातळीवरचा पुरस्कार जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी स्वीकारला. ऑनलाइन पद्धतीने ही परिषद सुरू झाली.
जल व्यवस्थापनातील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, स्मार्ट वॉटर मॅनेजमेंटचा उपयोग करून समाजाला विकासाच्या मार्गावर आणण्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या संघटनांना दि एनर्जी अँड एन्व्हायर्न्मेंट फाउंडेशन (EEF) या संस्थेतर्फे हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

श्री. जैन यांनी ग्लोबल एक्सलन्स ॲवॉर्ड- २०२१ स्वीकारताना सांगितले, की पाणी क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल पुरस्कार मिळाल्याचा आनंद झाला. हा पुरस्कार जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांनी शेतकऱ्यांसाठी दूरदृष्टीने केलेल्या कामाला मिळाला आहे. चार दशकांहून अधिक काळ अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी जैन उच्च कृषी तंत्रज्ञान फलदायी ठरत आहे. ही त्याचीच पावती आहे. जैन कृषी तंत्रज्ञानामुळे सूक्ष्म सिंचन करता आले आणि  पिकांच्या उत्पादनात भरीव झाली. हा पुरस्कार शेतकऱ्यांना समर्पित केला आहे. तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना मूल्य वृद्धी करता आली आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडले.

या परिषदेत ऑस्ट्रेलियाच्या वकिलातीतील उच्चायुक्त बॅरी ओ फॅरेला ए. ओ., नेदरलँडचे राजदूत मार्टेन व्हॅन डेन बर्ग, पॉवर फिनान कॉर्पोरेशनचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. व्ही. के. गर्ग आणि केंद्रीय ऊर्जा विभागाचे माजी सचिव अनिल राजदान ऑनलाइन सहभागी झाले.


इतर अॅग्रोमनी
वाढत्या मागणीने हरभरा दरात सुधारणापुणे : साठेबाज, व्यापारी आणि मिलर्सवर असलेली...
तूर, मूग, उडीद आयातीची प्रक्रिया सुरू;...पुणे : केंद्र सरकारने पंचवार्षिक करार करून...
रब्बीचे हमीभाव जाहीर : गव्हात ४०; हरभरा...नवी दिल्ली : केंद्र सरकारने रबी हंगामासाठी...
उडीद दरात सुधारणेची चिन्हेपुणे ः गेल्या हंगामात देशात उडदाचे उत्पादन कमी...
बेदाणा दरात प्रतिकिलो २५ ते ३० रुपयांची...सांगली : अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यामुळे...
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१...जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत...
साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करावी...नागपूर : एफआरपीत वाढ झाली असतानाच साखरेच्या...
सोयाबीन दराची पुन्हा दहा हजारी; दर...पुणे ः गेल्या सप्ताहात सोयाबीन दरात मोठी सुधारणा...
कडधान्याचे गणित पावसावरच अवलंबूनमुंबई : देशात यंदा मॅान्सूनची सुरुवात चांगली झाली...
साखरदराचा वारू चौखूर उधळला; ३५०० चा...कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांपासून स्थानिक...
पंढरपुरात बेदाण्यास सर्वाधिक ३०५ रुपये...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोयापेंड आयात थांबवा : राज्य सरकारचे...पुणे : जनुकीय परावर्तित (जीएम) सोयाबीनपेंडच्या...
साखर दराला झळाळी; दोन वर्षांतील...कोल्हापूर : साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारात...
ब्राझीलला दणका; भारतीय साखर उद्योगास...जगात घडणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनांमुळे...
ग्लोबल एक्सलन्स ॲवॉर्डने अनिल जैन यांचा...जळगाव : पाणी क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल ‘...
साखरच्या दरात २०० रुपयांनी वाढकोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढत...
कच्ची साखरनिर्यात यंदा फायदेशीर कोल्हापूर ः येत्या साखर हंगामात आंतरराष्ट्रीय...
उत्पादक कंपनीच्या संचालक मंडळाचे कार्यप्रत्येक ‘एफपीओ’चे संचालक मंडळ पाचपेक्षा कमी...
राज्यात हंगामावर यंदा जादा साखरेचे ओझेकोल्हापूर : यंदाच्या हंगामापूर्वी देशात गेल्या...
भारतीय साखरेला थायलंडचे आव्हानकोल्हापूर : येत्या हंगामात साखरनिर्यातीसाठी...