सोलापूर ‘झेडपी’चे कृषी, पशुसंवर्धनच्या सभापतिपदी अनिल मोटे

Anil Mote, President of Agriculture, Animal Husbandry, Solapur 'ZP'
Anil Mote, President of Agriculture, Animal Husbandry, Solapur 'ZP'

सोलापूर : जिल्हा परिषदेतील चार विषय समिती सभापतींच्या निवडीत भाजप समविचारी आघाडीचा पराभव झाला. भाजप समविचारी आघाडीला विजयराज डोंगरे यांच्या माध्यमातून फक्त एका समितीवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शेकापच्या आघाडीला प्रत्येकी एका समित्यांवर यश मिळाले आहे. अनिल मोटे यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापतिपदाची जबाबदारी आली आहे. डोंगरे यांच्याकडे पुन्हा अर्थ व बांधकाम समिती आली आहे. 

खुल्या वर्गातील समित्यांसाठी भाजप व समविचारी आघाडीकडून मोहोळ तालुक्‍यातील आष्टी गटाचे विजयराज डोंगरे व सांगोल्यातील एखतपूर गटाचे सदस्य अतुल पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने मानेगावचे (ता. माढा) अपक्ष सदस्य रणजितसिंह शिंदे व घेरडीचे शेकाप-राष्ट्रवादी आघाडीचे सदस्य अनिल मोटे यांना उमेदवारी दिली होती.

डोंगरे यांना ३४ तर पवार यांना ३२ मते मिळाली. तर मोटे यांना ३४ तर शिंदे यांना ३२ मते मिळाली. मतदारांनी या समिती निवडीत भाजप समविचारी आघाडीतील डोंगरे यांना तर राष्ट्रवादी, काँग्रेस व शेकाप आघाडीतील मोटे यांना सभापतिपदाची संधी मिळाली. त्यामुळे अनुक्रमे डोंगरे यांच्याकडे अर्थ व बांधकाम आणि मोटे यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धनची जबाबदारी आली. 

महिला व बालकल्याण समिती सभापती निवडीत राष्ट्रवादी-कॉँग्रेस व शेकाप आघाडीकडून सलगर (ता. अक्कलकोट) गटाच्या काँग्रेस सदस्या स्वाती शटगार यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात भाजप व समविचारीने मांडवे (ता. माळशिरस) गटाच्या भाजपच्या सदस्या संगीता मोटे यांना उमेदवारी दिली होती. शटगार यांना ३५ तर मोटे यांना ३१ मते मिळाली. या निवडीत शटगार चार मतांनी विजयी झाल्या. 

चिठ्ठीद्वारे धांडोरे यांची निवड

समाजकल्याण समिती सभापती निवडीत भाजप समविचारी आघाडीने रोपळे (ता. पंढरपूर) गटातील परिचारक आघाडीचे सदस्य सुभाष माने यांना मैदानात उतरविले होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने कडलास (ता. सांगोला) गटाच्या शेकाप-राष्ट्रवादीच्या सदस्या संगीता धांडोरे यांना मैदानात उतरविले होते. माने व धांडोरे यांना प्रत्येकी ३३ मते मिळाली. समसमान मते मिळाल्यानंतर चिठ्ठीद्वारे धांडोरे यांची समाजकल्याण सभापतिपदी निवड करण्यात आली. पीठासीन अधिकारी म्हणून महसूल शाखेचे उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी काम पाहिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com