जनावरांमधील ‘सीसीएचएफ' आजाराबाबत सतर्कतेच्या सूचना; गुजरातमध्ये आढळला प्रादुर्भाव

गुजरातमधील बोताड आणि कच्छ या जिल्ह्यातील जनावरांच्यामध्ये ‘सीसीएचएफ’ (Crimean Congo Hemorrhagic Fever) आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.
जनावरांमधील ‘सीसीएचएफ' आजाराबाबत सतर्कतेच्या सूचना; गुजरातमध्ये आढळला प्रादुर्भाव
जनावरांमधील ‘सीसीएचएफ' आजाराबाबत सतर्कतेच्या सूचना; गुजरातमध्ये आढळला प्रादुर्भाव

अकोला : गुजरातमधील बोताड आणि कच्छ या जिल्ह्यातील जनावरांच्यामध्ये ‘सीसीएचएफ’ (Crimean Congo Hemorrhagic Fever) आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. हा आजार जनावरांपासून माणसांना (झुनोटीक आजार) होण्याची शक्यता असल्याने प्रादुर्भाव आणि प्रसार रोखण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश अतिरीक्त पशुसंवर्धन आयुक्तांनी राज्यातील पशुसंवर्धन यंत्रणेला दिले आहेत.  राज्यात सध्या जनावरांच्यामध्ये लंम्पी या विषाणूजन्य त्वचा आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला असल्याने लसीकरण सुरु आहे. त्यानंतर आता ‘सीसीएचएफ’ या नवीन आजाराचा प्रसार होण्याची शक्यता पाहता खबरदारी घेण्याची गरज आहे.  महाराष्ट्र राज्य गुजरातला लागून असल्याने या आजाराचा प्रादुर्भाव आपल्याकडे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कांगो, दक्षिण आफ्रिका, चीन, हंगेरी, इराण या देशांमध्ये या पुर्वी या आजाराचा प्रादुर्भाव झालेला आहे.

विषाणूजन्य आजाराचा प्रसार       नैरो विषाणूमुळे प्रसार. हा विषाणू मुख्यत्वे करून हायलोमा जातीच्या गोचिडांद्वारे एका जनावरांपासून दुसऱ्या जनावरास आणि बाधीत जनावरापासून मानवांमध्ये  संक्रमित होतो.     आजारामुळे गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या या पाळीव जनावरांमध्ये तसेच ऑस्ट्रीच, शहामृग या पक्षांमध्ये सहसा आजाराची लक्षणे दिसून येत नाहीत. तथापि अशी बाधित जनावरे, पक्षी या विषाणूंचे वाहक म्हणून कार्यरत राहतात. अशा जनावरांच्या संपर्कात आलेल्या माणसांना (जनावराचे मालक, जनावरांच्या संपर्कातील व्यक्ती, खाटीक, उपचार करणारे पशुवैद्यक व कर्मचारी) या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते.       बाधित जनावरांचे मांस खाल्ल्याने तसेच बाधित जनावरांच्या रक्ताच्या संपर्कात आल्याने, गोचिड, पिसवा, डास यांच्या दंशामुळे माणसांमध्ये प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. माणसासाठी हा आजार घातक आहे.     आजाराच्या प्रादुर्भावामुळे बाधित झालेल्या व्यक्तींपैकी ३० टक्के व्यक्ती त्वरीत निदान आणि उपचार न झाल्यास मृत्यू पावण्याची शक्यता असते.      सध्या या विषाणूजन्य आजाराविरुद्ध प्रभावी व हमखास उपचार पद्धती उपलब्ध नाही. 

बाधित झाल्याची लक्षणे   आजाराने बाधित झालेल्या व्यक्तीला डोकेदुखी, जास्त ताप येणे, सांधेदुखी, पोटदुखी, उलटी ही लक्षणे दिसतात.  डोळे लाल होणे, घशात तसेच तोंडातील वरच्या भागात लाल ठिपके दिसू लागतात.   आजार वाढल्यास त्वचेखालील रक्तस्त्राव, नाकातून रक्तस्त्राव, लघवीतून रक्तस्त्राव तसेच काही रुग्णांमध्ये कावीळसारखी लक्षणे दिसून येतात.  खबरदारीच्या उपाययोजना      जनावरे, शेळ्या मेंढ्या तसेच गोठ्यातील गोचिड, किटकांचे तातडीने नियंत्रण करावे.       गोचिड हाताने काढणे, हाताने मारणे टाळावे. गोचिड चावणार नाही याची काळजी घ्यावी.       पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पशुपालकांचे प्रबोधन करावे.     जनावरात गोचिड प्रादुर्भाव आढळून आल्यास पशुतज्ज्ञाच्या सल्याने शिफारशीत गोचिडनाशकांचा वापर करावा.  गुजरातमधून जनावरे आणण्याचे टाळा...     हा आजार गुजरातमधील कच्छ व बोताड जिल्ह्यात दिसून आला. तेथे जोपर्यंत आजार नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत गुजरातमधून गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या खरेदी करणे, चारा आणू नये,असा सल्ला पशूसंवर्धन विभागाने दिला आहे.       नाशिक, नंदुरबार, धुळे व पालघर जिल्ह्यातील गुजरात राज्याच्या सिमेशी संलग्न भागात तातडीने गोचिड निर्मुलनाचा कार्यक्रम राबवावा. आंतरराज्य सीमा रेषेवरील तपासणी नाक्यांमध्ये राज्यात येणाऱ्या पशुधनाची तपासणी करावी. जनावरांचे मांस चांगल्या प्रकारे शिजवून खावे. आजारी जनावरांवर उपचार करताना वापरल्या जाणाऱ्या सामुग्रीची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी. जनावरांमध्ये आढळून येत असलेल्या ‘सीसीएचएफ’ रोगाच्या अनुषंगाने अद्यापपर्यंत विभागाकडून काहीही सूचना आलेल्या नाही. हा रोग गुजरातच्या काही भागात असल्याचे बातम्यांमधून कळाले. आपल्या भागात अशी लागण झालेली नसल्याने सध्या उपाययोजनांबाबत बोलता येणार नाही. प्रशासनाकडून जे निर्देश येतील तशी त्यांची अंमलबजावणी केली जाईल. - डॉ. जी. एम. दळवी,  जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com