agriculture news in marathi Animal cchf disease alert from State Government | Agrowon

जनावरांमधील ‘सीसीएचएफ' आजाराबाबत सतर्कतेच्या सूचना; गुजरातमध्ये आढळला प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

गुजरातमधील बोताड आणि कच्छ या जिल्ह्यातील जनावरांच्यामध्ये ‘सीसीएचएफ’ (Crimean Congo Hemorrhagic Fever) आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

अकोला : गुजरातमधील बोताड आणि कच्छ या जिल्ह्यातील जनावरांच्यामध्ये ‘सीसीएचएफ’ (Crimean Congo Hemorrhagic Fever) आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. हा आजार जनावरांपासून माणसांना (झुनोटीक आजार) होण्याची शक्यता असल्याने प्रादुर्भाव आणि प्रसार रोखण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश अतिरीक्त पशुसंवर्धन आयुक्तांनी राज्यातील पशुसंवर्धन यंत्रणेला दिले आहेत. 

राज्यात सध्या जनावरांच्यामध्ये लंम्पी या विषाणूजन्य त्वचा आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला असल्याने लसीकरण सुरु आहे. त्यानंतर आता ‘सीसीएचएफ’ या नवीन आजाराचा प्रसार होण्याची शक्यता पाहता खबरदारी घेण्याची गरज आहे.  महाराष्ट्र राज्य गुजरातला लागून असल्याने या आजाराचा प्रादुर्भाव आपल्याकडे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कांगो, दक्षिण आफ्रिका, चीन, हंगेरी, इराण या देशांमध्ये या पुर्वी या आजाराचा प्रादुर्भाव झालेला आहे.

विषाणूजन्य आजाराचा प्रसार  
    नैरो विषाणूमुळे प्रसार. हा विषाणू मुख्यत्वे करून हायलोमा जातीच्या गोचिडांद्वारे एका जनावरांपासून दुसऱ्या जनावरास आणि बाधीत जनावरापासून मानवांमध्ये 
संक्रमित होतो.
    आजारामुळे गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या या पाळीव जनावरांमध्ये तसेच ऑस्ट्रीच, शहामृग या पक्षांमध्ये सहसा आजाराची लक्षणे दिसून येत नाहीत. तथापि अशी बाधित जनावरे, पक्षी या विषाणूंचे वाहक म्हणून कार्यरत राहतात. अशा जनावरांच्या संपर्कात आलेल्या माणसांना (जनावराचे मालक, जनावरांच्या संपर्कातील व्यक्ती, खाटीक, उपचार करणारे पशुवैद्यक व कर्मचारी) या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. 
     बाधित जनावरांचे मांस खाल्ल्याने तसेच बाधित जनावरांच्या रक्ताच्या संपर्कात आल्याने, गोचिड, पिसवा, डास यांच्या दंशामुळे माणसांमध्ये प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. माणसासाठी हा आजार घातक आहे.
    आजाराच्या प्रादुर्भावामुळे बाधित झालेल्या व्यक्तींपैकी ३० टक्के व्यक्ती त्वरीत निदान आणि उपचार न झाल्यास मृत्यू पावण्याची शक्यता असते. 
    सध्या या विषाणूजन्य आजाराविरुद्ध प्रभावी व हमखास उपचार पद्धती उपलब्ध नाही. 

बाधित झाल्याची लक्षणे 
 आजाराने बाधित झालेल्या व्यक्तीला डोकेदुखी, जास्त ताप येणे, सांधेदुखी, पोटदुखी, उलटी ही लक्षणे दिसतात.
 डोळे लाल होणे, घशात तसेच तोंडातील वरच्या भागात लाल ठिपके दिसू लागतात. 
 आजार वाढल्यास त्वचेखालील रक्तस्त्राव, नाकातून रक्तस्त्राव, लघवीतून रक्तस्त्राव तसेच काही रुग्णांमध्ये कावीळसारखी लक्षणे दिसून येतात. 

खबरदारीच्या उपाययोजना 
    जनावरे, शेळ्या मेंढ्या तसेच गोठ्यातील गोचिड, किटकांचे तातडीने नियंत्रण करावे.  
    गोचिड हाताने काढणे, हाताने मारणे टाळावे. गोचिड चावणार नाही याची काळजी घ्यावी. 
     पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पशुपालकांचे प्रबोधन करावे.
    जनावरात गोचिड प्रादुर्भाव आढळून आल्यास पशुतज्ज्ञाच्या सल्याने शिफारशीत गोचिडनाशकांचा वापर करावा. 

गुजरातमधून जनावरे आणण्याचे टाळा...
    हा आजार गुजरातमधील कच्छ व बोताड जिल्ह्यात दिसून आला. तेथे जोपर्यंत आजार नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत गुजरातमधून गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या खरेदी करणे, चारा आणू नये,असा सल्ला पशूसंवर्धन विभागाने दिला आहे.  
    नाशिक, नंदुरबार, धुळे व पालघर जिल्ह्यातील गुजरात राज्याच्या सिमेशी संलग्न भागात तातडीने गोचिड निर्मुलनाचा कार्यक्रम राबवावा. आंतरराज्य सीमा रेषेवरील तपासणी नाक्यांमध्ये राज्यात येणाऱ्या पशुधनाची तपासणी करावी. जनावरांचे मांस चांगल्या प्रकारे शिजवून खावे. आजारी जनावरांवर उपचार करताना वापरल्या जाणाऱ्या सामुग्रीची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी.

जनावरांमध्ये आढळून येत असलेल्या ‘सीसीएचएफ’ रोगाच्या अनुषंगाने अद्यापपर्यंत विभागाकडून काहीही सूचना आलेल्या नाही. हा रोग गुजरातच्या काही भागात असल्याचे बातम्यांमधून कळाले. आपल्या भागात अशी लागण झालेली नसल्याने सध्या उपाययोजनांबाबत बोलता येणार नाही. प्रशासनाकडून जे निर्देश येतील तशी त्यांची अंमलबजावणी केली जाईल.
- डॉ. जी. एम. दळवी, 
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद अकोला

 


इतर बातम्या
आयकर भरणाऱ्या ६५१ शेतकऱ्यांना नोटिसाशहादा, जि. नंदुरबार : आयकर भरत असूनही केंद्र...
शेतकऱ्यांनी केळी पीकविमा भरू नयेजळगाव ः हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी...
सांगलीत रब्बीचा ३९ हजार हेक्टरवर पेरासांगली ः जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी...
मराठवाड्यात नुकसान भरपाईसाठी १७३४...औरंगाबाद : ‘‘मराठवाड्यातील पिकांच्या नुकसान...
अमरावतीमधील तीन लाख हेक्‍टरसाठी २१४...अमरावती : संततधार पाऊस, ढगाळ वातावरण, कीडरोगाचा...
रत्नागिरीतील पीक नुकसानीची भरपाई मिळेल...चिपळूण, जि. रत्नागिरी ः चिपळूण तालुक्यात मागील...
शितादही करण्यापुरताही कापूस लागला नाहीअकोला ः शेतकऱ्याने कपाशीची लागवड केली. कपाशीची...
परभणी जिल्ह्यात पीकविमा परताव्यासाठी ३१...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...
कुक्कुटपालन चांगल्या उत्पन्नाचा व्यवसाय...औरंगाबाद : ‘‘कुक्कुटपालनासाठी जागा, खाद्य,...
सीताफळ प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन...अकोला ः गेल्या काही वर्षात सीताफळ लागवडीकडे...
नगरमधील ६० गावांतील ७८ पाणी नमुने दूषितनगर ः जिल्ह्यातील १४ तालुक्‍यांतील सप्टेंबर...
पुणे कृषी महाविद्यालयात आंदोलनपुणे ः सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी महात्मा...
गोंदिया जिल्ह्यातील दोन संस्थांचा धान...गोंदिया : नियमबाह्यरीत्या धान खरेदी तसेच...
हिंगोली जिल्ह्यात तीन लाख ७ हजार...हिंगोली : जून ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टीमुळे...
उत्पादन खर्चाच्या दुप्पट दराचे काय? ः...नाशिक : ‘‘केंद्र सरकारने कांदा...
सोलापूर जिल्ह्यात पावणे दोन लाख हेक्‍टर...सोलापूर : अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात...
सोलापुरात महावितरण मुख्यालयाला ‘...सोलापूर : लॉकडाऊन काळातील शेतीचे संपूर्ण वीज बिल...
सोलापूर जिल्ह्यात तीस हजार शेतीपंपाच्या...सोलापूर :  अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे...
कांद्याची कोट्यवधीची उलाढाल ठप्प नाशिक: केंद्र सरकारने कांद्याच्या वाढत्या दरावर...
करार शेतीची जबाबदारी कृषी विभागाकडेचपुणे: करारशेतीचा नवा कायदा अस्तित्वात आल्यानंतर...