पशुगणना प्रगणकांचे मानधन थकले

जिल्ह्यातील पशुगणना पूर्ण केलेल्या प्रगणकांचे आधार कार्ड, बॅंक पासबुक आणि पॅन कार्ड हे बॅंकेला लिंकिंग केले आहेत. दोन तालुक्यांतील ही प्रक्रिया अपूर्ण आहे. ती प्रक्रिया लवकरच पूर्ण करून या महिनाअखेरीस त्यांचे मानधन प्रगणकांच्या खात्यावर थेट वर्ग होतील. - संजय धकाते,उपायुक्त जिल्हा पशुसंवर्धन
Animal Census Breeders honored
Animal Census Breeders honored

सांगली : पशुविभागाकडून जिल्ह्यातील एप्रिल-मे महिन्यात पशुगणना केली होती. मात्र गेल्या नऊ महिन्यांपासून या पशुगणना केलेल्या सुमारे २२५ ते २५० प्रकणकांचे मानधन अद्यापही दिले नाही. हे मानधन शासन दरबारात मंजुरीसाठी तसेच पडून आहे. त्यामुळे प्रगणकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात सन २०१२ च्या पशुगणनेनुसार २६ लाख ३२ हजार ४०४ इतकी जनावरे आहेत. पशुगणना केल्याने जिल्ह्यात किती पशुधन वाढले याची माहिती मिळते. त्याचबरोबर कोणत्या जातीच्या जनावरांची वाढ झाली आहे. त्यानुसार शासनाकडून लसीकरणासह विविध प्रकारच्या औषधांची मागणी करणे सोपे होते. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी, डॉक्टर आणि यासह दवाखान्यांची संख्या निश्‍चित केली जाते. त्यामुळे ही पशुगणना दर पाच वर्षांनी केली जाते. मात्र जिल्ह्यातील पशुधनाची संख्या ही सन २०१२ च्या गणनेनुसार आहे.

सन २०१७ ला काही तांत्रिक अडचणीमुळे पशुगणना झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जनावरांना वेळेत लसीकरण करण्यास अडचणी निर्माण झाल्या. जुन्या गणनेनुसार जनावरांची संख्येनुसार लसीकरणासह विविध औषधांची मागणी करत असल्याने लसीकरणाचा तुटवडा पडत असल्याचे चित्र आहे.

सन २०१९ मध्ये पशु विभागाने पशुगणना करण्याची सुरुवात केली. त्यासाठी या विभागाने सुमारे २२५ ते २५० प्रगणकांची निवड केली. एपिल आणि मे महिन्यात जिल्ह्यातील पशूची गणना केली आहे. या प्रगणकांना शहरी भागातील कुटुंबासाठी साडेसहा रुपये, तर ग्रामीण भागातील कुटुंबासाठी साडेसात रुपये असे देण्याचे ठरले आहे. मात्र गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून पशुगणना प्रगणकांचे मानधन अद्यापही त्यांना दिले नाही. त्यामुळे मानधन कधी मिळणार असा प्रश्‍न प्रगणकांकडून उपस्थित होऊ लागला आहे. 

जत तालुक्याचे पाच लाख रुपये थकले

जत तालुक्यात २३ पशुवैद्यकीय दवाख्यांसाठी प्रत्येकी एक व नगर परिषदेमध्ये प्रत्येकी दोन अशा एकूण २५ प्रगणकांनी पशुगणना केली आहे. अशी मिळून ५ लाख २५ हजार रुपये या प्रगणकांचे मानधन थकले आहे.

  • शहरी भागातील प्रति घरासाठी ः ६ रुपये ५० पैसे
  •  ग्रामीण भागातील प्रति घरासाठी ः ७ रुपये ५० पैसे
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com