पुणे जिल्ह्यात पशुगणनेचे काम अपूर्ण

 संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे   : जिल्ह्यात पशुगणनेचे काम फेब्रुवारी अखेरपर्यंत संपविणे अपेक्षित होते. परंतु, मार्च महिना संपला तरीही अद्याप पशुगणनेचे काम पूर्ण झाले नाही. कामाचा वेग पाहता अजून दोन महिने पशुगणनेला लागतील असे स्थिती आहे. आचारसंहितेचे कारण देत पशुसंवर्धन विभागाकडून कामाला उशीर होत असल्याचे सांगण्यात आले. 

राज्यातील जिल्हानिहाय शेळी, मेंढी, गाय, म्हैस, कोंबडी, बदके व इतर सर्व पशुंची जनगणना केली जाते. त्यानुसार जिल्ह्यात १ ऑक्‍टोबर २०१८ पासून २० व्या पशुगणनेला सुरवात झाली आहे. मागील सहा महिन्यांपासून पशुगणनेचे काम सुरू आहे. तरीही अद्याप ती पूर्ण झालेली नाही. पुणे जिल्ह्यातील ९ लाख कुटुंबांकडील पशुगणना राहिली असून, पशुगणनेमध्ये ग्रामीण भाग राज्यात ९ व्या, शहरी भाग १७ व्या तर संपूर्ण जिल्हा २५ व्या क्रमांकावर आहे. 

पशुगणनेच्या सुरवातीला अनेक तांत्रिक अडचणी आल्यामुळे हे काम संथ गतीने सुरू होते. त्यानंतर संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) बदलण्यात आली आणि डिसेंबर महिन्यापासून पुन्हा नव्याने पशुगणना सुरू करण्यात आली. 

राज्य शासनाच्या आदेशानुसार फेब्रुवारी अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट राज्य शासनाकडून देण्यात आले आहे. मात्र, त्या मुदतीत काम पूर्ण होणे शक्‍य नसल्यामुळे १५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. परंतु, अद्याप पशुगणना पूर्ण झालेली नाही. परंत, जी कामे आचारसंहितेपूर्वीच संपवायची होती ती पूर्ण का झाली नाही असा जाब राज्य शासनाकडून विचारला जात आहे. त्यामुळे पशुगणना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू आहे.  

जिल्ह्यातील पशुगणना झालेल्या कुटुंबांची स्थिती
विभाग मोजणी झालेली कुटुंब मोजणी राहिलेली कुटुंब
ग्रामीण ६ लाख ८० हजार २६५  ९९ हजार ७०७
शहरी    ५ लाख ८९ हजार ५७१ ७ लाख ८१ हजार ९६०
एकूण १२ लाख ६९ हजार ८३६ ८ लाख ८१ हजार ६६७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com