वनगायींसह प्राण्यांचे अस्तित्व दुष्काळाने संकटात

वनगायी
वनगायी

करकंब, जि. सोलापूर ः वेळ दुपारी एक​ची. आकाशात डोक्यावरून आग ओकणारा सूर्यनारायण. संपूर्ण वनात वृक्षांचे केवळ सांगाडे. जंगल असूनही हिरव्या पानांचा पत्ताच नाही. खडकाळ जमिनीवरही गवाताची आडवी काडी नाही. बकाल बनलेल्या वनात शंभरएक वनगायींचा कळप विसावलेला. तहान आणि भुकेने व्याकूळ झालेल्या वनगायींना साधी सावलीही नाही. दूरवर चार-पाच हताश झालेली हरणे कान टवकारून उभी. दुष्काळाची भयानक दाहकता दर्शविणारे हे चित्र आहे बार्डी (ता. पंढरपूर) येथील वनाचे! सध्या ग्रामीण भागामध्ये दुष्काळाची दाहकता चांगलीच जाणवू लागली आहे. एकीकडे भूगर्भातील पाणीपातळी खालावून विहिरी आणि बोअर कोरडे ठणठणीत पडत आहेत. शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. शासनदरबारी पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या चालू करणे आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकर चालू करणे यासाठी दबाव वाढविला जात आहे. पण याचवेळी ग्रामीण भागातील जंगालांमधील वन्यप्राण्यांची चारा पाण्यावाचून अतिशय दयनीय अवस्था होत असताना प्रशासनाचे मात्र त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.  वनात सध्या वनगायी, हरिण आणि काळवीट हे प्राणी वास्तव्यास आहेत. मात्र संपूर्ण क्षेत्रात या प्राण्यांसाठी गवताची आडवी काडीसुद्धा शिल्लक नाही की पिण्यासाठी पाण्याचा कोठे ठिपूसही दिसत नाही. एवढे होऊनही वन विभागाला मात्र याचे कसलेही गांभीर्य नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com