जालन्यात आजपासून राष्ट्रीय पशुपक्षी प्रदर्शन

जालन्यात आजपासून राष्ट्रीय पशुपक्षी प्रदर्शन
जालन्यात आजपासून राष्ट्रीय पशुपक्षी प्रदर्शन

जालना : येथे शनिवारपासून (ता. २) आयोजित राष्ट्रीय स्तरावरील पशुपक्षी प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली आहे. या प्रदर्शनाचे खास आकर्षण असणारा हरियानातील महाकाय सुलतान व युवराज जालन्यात दाखल झाला आहे. प्रदर्शन सुरू होण्यास अवधी असला तरी आजपासूनच उत्सुकता लागून असणारांची प्रदर्शनस्थळाकडे गर्दी जमणे सुरू झाले आहे.  राज्य शासनाच्या पुढाकारातून जवळपास वीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पहिल्यांदाच राज्यात अशाप्रकारचे राष्ट्रीय स्तरावरील पशुपक्षी प्रदर्शन भरते आहे. हरियानवी सुलतान, युवराज या महाकाय रेड्यांबरोबरच महाराष्ट्र, हरियाणाना, उत्तर प्रदेश आदी विविध राज्यांतून म्हशी, गायी, पशुपक्ष्यांच्या विविध जाती प्रदर्शनस्थळी दाखल झाल्याची माहिती आयोजकांनी दिली. त्यामध्ये देवणी, लालकंधारी, गीर, साहिवाल, जमनापरी, जाफराबादी आदी जातींचे पशू दाखल झाले आहेत. याशिवाय सीडीपीओ मुंबईचे १५ ते २० जातीचे कुक्‍कुट पक्षी, जपानी लाव्ही पक्षी प्रदर्शनस्थळी दाखल झाले आहेत. माफसू, फिशरीची स्टॉल उभारणी जवळपास अंतिम टप्प्यात होती. याआधी असे प्रदर्शन राज्यात ओरस येथे झाले होते. त्या वेळी केवळ पशुपक्ष्यांच्या विविध जाती सहभागी झाल्या होत्या. प्रदर्शनात पशुपालनातील नवतंत्रज्ञान, त्याच्या स्वीकाराने आलेले परिवर्तन, दुष्काळात घ्यावयाची काळजी व ते टिकवून ठेवण्यासाठी करावयाच्या बाबी, चारा व्यवस्थापन आदींविषयी प्राधान्याने शेतकऱ्यांना परिपूर्ण माहिती विविध चर्चासत्रांच्या माध्यमातून व वेगवेगळ्या स्टॉलच्या माध्यमातून दिली जाणार आहे.  महाराष्ट्रासह, कर्नाटक, हरियाना, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, गुजरात, गोवा आदी राज्यांतील विविध जातींच्या गायी, म्हशी, वळू, शेळ्या, मेंढ्या, घोडे, कोंबड्या आदी पशुपक्षी प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी रात्री उशिरापर्यंत व उद्या सकाळपर्यंत जालन्याच्या दिशेने येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली. शासन, सेवाभावी संस्था, कृषी, पशुपालनसंबंधी काम करणारे घटक यांचे जवळपास शंभर स्टॉल या प्रदर्शनात असणार आहेत. शिवाय, बचत गटाचेही स्टॉल असणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com