पशुचिकित्सा व्यवसायी आंदोलनाने पशुसेवा प्रभावित 

पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक) संघटनेने विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या कामबंद आंदोलनाचा राज्यात पशू आरोग्य सेवेवर परिणाम झाला असल्याचा दावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
animal
animal

नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक) संघटनेने विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या कामबंद आंदोलनाचा राज्यात पशू आरोग्य सेवेवर परिणाम झाला असल्याचा दावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आंदोलनामुळे पशुसेवा मिळण्याला अडचणी येत असल्याचे शेतकऱ्यांचेही म्हणणे आहे. मात्र पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी मात्र आरोग्य सेवेवर परिणाम झाला नसून, सर्व आरोग्य सेवा सुरळीत सुरू असल्याचे सांगितले आहे. 

मंगळवारी अंदोलनाचा तिसरा दिवस होता. राज्यातील २ हजार ८५३ पशू आरोग्य संस्थांमधील ४ हजार ५०० पशुचिकित्सा व्यवसायी काम करत आहेत. त्यातील पशुधन पर्यवेक्षक व सहायक पशुधन विकास अधिकारी बहुतांश लोक आंदोलनात सहभागी झाल्याने ५० टक्क्यांपेक्षा जास्त परिणाम झाल्याचा दावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळला आहे. सर्व पशुसेवा सुरळीत सुरू आहे. पशुसेवा मिळत नसल्याबाबत एकही तक्रार नाही असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

दरम्यान, पशुचिकित्सा व्यवसायी यांचाही अंदोलनाला पाठिंबा असून सरकारने मागण्या गांभिर्याने घ्याव्यात अशी मागणी डॉ. कृषिराज टकले यांनी केली आहे.  प्रतिक्रिया पशुवैद्यकीय रुग्णालयात काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले असल्याने वेळेवर आरोग्य सेवा मिळत नाही. त्यांचे आंदोलन सुरू असल्याने सेवा देण्याबाबत जास्ती आग्रह करता येत नाही. आता दोन दिवसांपासून बंद आहे. जास्त दिवस बंद राहिला तर अडचणी येऊ शकतात.  - अनिल सुपेकर, शेतकरी भावी निमगाव, ता. शेवगाव, जि. नगर 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com