agriculture news in Marathi animal health service disturb due to strike of veterinary doctors Maharashtra | Agrowon

पशुचिकित्सा व्यवसायी आंदोलनाने पशुसेवा प्रभावित 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 ऑगस्ट 2021

 पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक) संघटनेने विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या कामबंद आंदोलनाचा राज्यात पशू आरोग्य सेवेवर परिणाम झाला असल्याचा दावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक) संघटनेने विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या कामबंद आंदोलनाचा राज्यात पशू आरोग्य सेवेवर परिणाम झाला असल्याचा दावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आंदोलनामुळे पशुसेवा मिळण्याला अडचणी येत असल्याचे शेतकऱ्यांचेही म्हणणे आहे. मात्र पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी मात्र आरोग्य सेवेवर परिणाम झाला नसून, सर्व आरोग्य सेवा सुरळीत सुरू असल्याचे सांगितले आहे. 

मंगळवारी अंदोलनाचा तिसरा दिवस होता. राज्यातील २ हजार ८५३ पशू आरोग्य संस्थांमधील ४ हजार ५०० पशुचिकित्सा व्यवसायी काम करत आहेत. त्यातील पशुधन पर्यवेक्षक व सहायक पशुधन विकास अधिकारी बहुतांश लोक आंदोलनात सहभागी झाल्याने ५० टक्क्यांपेक्षा जास्त परिणाम झाल्याचा दावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळला आहे. सर्व पशुसेवा सुरळीत सुरू आहे. पशुसेवा मिळत नसल्याबाबत एकही तक्रार नाही असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

दरम्यान, पशुचिकित्सा व्यवसायी यांचाही अंदोलनाला पाठिंबा असून सरकारने मागण्या गांभिर्याने घ्याव्यात अशी मागणी डॉ. कृषिराज टकले यांनी केली आहे. 

प्रतिक्रिया
पशुवैद्यकीय रुग्णालयात काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले असल्याने वेळेवर आरोग्य सेवा मिळत नाही. त्यांचे आंदोलन सुरू असल्याने सेवा देण्याबाबत जास्ती आग्रह करता येत नाही. आता दोन दिवसांपासून बंद आहे. जास्त दिवस बंद राहिला तर अडचणी येऊ शकतात. 
- अनिल सुपेकर, शेतकरी भावी निमगाव, ता. शेवगाव, जि. नगर 


इतर बातम्या
ऑनलाइन ठिबक योजनेत पुन्हा कागदपत्रांचा...पुणे : कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची परंपरा...
सर्वदूर जोरदार पावसाची शक्यतापुणे : बंगालच्या उपसागरातील ‘गुलाब’...
प्रगतिपथावरील जलसंधारण प्रकल्प लवकर...औरंगाबाद : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य...
‘रूफटॉप सौरऊर्जे’ला कसे मिळणार बूस्टर?नागपूर ः दीर्घ खोळंब्यानंतर महावितरणने पुन्हा...
केळी, संत्रा क्लस्टरमध्ये वर्ध्याचा...वर्धा : केंद्राच्या धर्तीवर राज्याने निर्यात धोरण...
सांगलीत ३० टक्के द्राक्ष फळछाटणी पूर्णसांगली ः जिल्ह्यात यंदाच्या द्राक्ष फळ छाटणीस...
कृषी उत्पन्नवाढीसाठी मागेल  त्या...सातारा : कृषी उत्पन्न वाढीसाठी तसेच मातीचा पोत...
मांजरा नदीला पूर, पाणी पात्राबाहेर निलंगा, जि. लातूर : हवामान विभागाने वर्तवलेल्या...
परभणी जिल्ह्यातील  दोन मंडलांत...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२...
‘अलमट्टी’ची उंची वाढवू नका ः राजू शेट्टीकोल्हापूर : कोल्हापूर, सांगली व बेळगाव...
ग्रामीण भागाची वीजतोडणी मोहीम...अकोला : अतिवृष्टी सुरू असताना ग्रामीण भागातील...
बोधेगाव परिसराला तिसऱ्यांदा ...नगर : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात शनिवारी...
'गुलाब' चक्रीवादळ कलिंगापट्टणमनजीक...पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे 'गुलाब'...
येवला बाजार समितीचा ‘अंनिस’कडून गौरवयेवला, जि. नाशिक : ६४ वर्षांची परंपरा मोडीत काढत...
सोयाबीन विक्रीची घाई नकोनागपूर : मुहूर्ताचे दर पाहून शेतकऱ्यांकडून अधिक...
‘गुलाब’ चक्रीवादळ आज पूर्व किनाऱ्याला...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
अन्न प्रक्रिया उद्योगासाठी  कोल्हापुरात...चंदगड, जि. कोल्हापूर : कृषी मालावर आधारित...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे...
साहित्य संमेलनातून वैचारिक दिशा...औरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी...
लहान संत्रा फळांचे करायचे काय?नागपूर : लहान आकाराच्या संत्रा फळांवर नांदेड...