पशू चिकित्सालय उघडणार ९ वाजता

पशुपालन पद्धतीत काळानुरूप झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पशुचिकित्सालयाच्या वेळेत बदल करण्याची मागणी होती.
animal
animal

नागपूर : पशुपालन पद्धतीत काळानुरूप झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पशुचिकित्सालयाच्या वेळेत बदल करण्याची मागणी होती. याची दखल घेत राज्य शासनाने पशुचिकित्सालयाच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता चिकित्सालय सकाळी ९ ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत उघडे राहणार आहे.  राज्यभरात पशुपालन पद्धतीत बदल होत असल्याचे निरीक्षण महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेने नोंदविले आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास पशुपालक गाव, शहरात किंवा संकलन केंद्रावर दूध घालायला जातात. सकाळी दूध घालून परतल्यावर तसेच संध्याकाळी दूध घालायला जाण्यापूर्वी त्यांच्याकडे वेळ असतो. या दरम्यान ते आपल्या जनावरांना उपचारासाठी पशुचिकित्सालयात आणू शकतात. त्यामुळे पशुचिकित्सालय वेळेत बदल करण्याची मागणी आहे.  या संदर्भाने महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेने पशुसंवर्धन सचिव अनुप कुमार, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्याकडे पाठपुरावा केला.

असा आहे वेळेत बदल

  • सकाळी ९ ते दुपारी ४.३० 
  • शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १
  • लंच ब्रेक : १ ते १.३०
  • पशुचिकित्सालयांची स्थिती  ४८४७ एकूण राज्य 

    ३३ जिल्हास्तर

    ४१७७ जिल्हा परिषदेकडे 

    ६७० राज्य सरकारकडे पशुचिकित्सालयाच्या वेळेत बदल करण्याची मागणी होती. राज्यातील बहुतांश पशुचिकित्सालय जिल्हा परिषदेच्या अखत्यारित आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून या पार्श्वभूमीवर अभिप्राय मागविण्यात आले. त्यानंतर वेळेत बदल करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला गेला. सकाळी शेतातील कामे आटोपून पशुपालक आता पशुचिकित्सालयात येतील. त्यामुळे त्यांची सोय झाली आहे. - सचिंद्र प्रताप सिंह,  आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे. 

    पशुपालनाच्या पद्धतीत बदल झाल्याने पशू चिकित्सालयाच्या वेळेत बदलाची मागणी दूध संघ,  पशुपालक, ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन केली होती. ती पूर्णत्वास गेली  आहे.  - रामदास गाडे, अध्यक्ष,  महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटना.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com