'पशुसंवर्धन'ला स्वतंत्र मंत्रालय; गिरिराज सिंह कॅबिनेट मंत्री

'पशुसंवर्धन'ला स्वतंत्र मंत्रालय; गिरिराज सिंह कॅबिनेट मंत्री
'पशुसंवर्धन'ला स्वतंत्र मंत्रालय; गिरिराज सिंह कॅबिनेट मंत्री

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी मंत्रालयांतर्गत येणाऱ्या पशुसंवर्धन, डेअरी आणि मत्स विभागाला स्वतंत्र कॅबिनेट मंत्री दिला गेल्याने या क्षेत्राच्या अपेक्षा उंचालवल्या आहेत. गिरिराज सिंह हे या मंत्रालयाचे पहिले कॅबिनेट मंत्री असतील. तर संजीव कुमार बलियान, प्रताप चंद्र सरंगी राज्यमंत्री असणार आहेत.  यापूर्वीच्या मोदी सरकारमध्ये गिरिराज सिंह यांच्याकडे सूक्ष्म, लहान आणि मध्यम उद्योग विभागाचे राज्य मंत्रिपद होते. मात्र, २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला डोकेदुखी ठरलेला आणि संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या कन्हैयाकुमार या डाव्या युवा नेत्याचा साडेचार लाख मतांनी पराभव करून पुन्हा खासदार झालेल्या गिरिराज यांना कॅबिनेट  मंत्रिपदाची बढती मिळाली आहे. गिरिराज हे बिहारमधील बेगुसराई मतदारसंघातून प्रतिनिधित्व करतात. जनमानसातील नेता म्हणून ओळख असलेले गिरिराज हे वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत लक्ष वेधून घेत असतात. लाखीसरई जिल्ह्यातील भूमिहार ब्राह्मण कुटुंबातील गिरिराज हे २००२ पासून बिहार विधानसभेचे सलग १२ वर्ष सदस्य होते. सहकार राज्यमंत्री २००५ मध्ये निवड झाल्यानंतर २०१० ते २०१३ दरम्यान त्यांच्याकडे राज्याच्या पशुसंवर्धन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट्टर समर्थक असलेले गिरिराज हे २०१४च्या मोदी लाटेत नवाडा येथून पहिल्यांदा खासदार झाले. २०१३ मध्ये भाजप-जेडीयू यांच्यातील बेबनावानंतर २०१४ मध्ये केंद्रात मोदी यांनी त्यांना सूक्ष्म, लहान आणि मध्यम उद्योग विभागाचे राज्य मंत्रिपद दिले होते.  २८ वर्षांनंतर स्वतंत्र मंत्रालय १ फेब्रुवारी १९९१ ला केंद्रीय कृषी मंत्रालयांतर्गत पशुसंवर्धन विभागाला स्वतंत्र दर्जा प्राप्त झाला होता. १० ऑक्टोबर १९९७ रोजी पशुसंवर्धन विभागात मत्स विभागाचे निर्माण करण्यात आले होते. शुक्रवारी (ता. ३१) गिरिराज सिंह यांच्या पशुसंवर्धन, डेअरी आणि मत्स मंत्रालय म्हणून कॅबिनेट मंत्रिपदी नियुक्तीनंतर २८ वर्षांनंतर स्वतंत्र मंत्रालयाचा दर्जा प्राप्त झाला आहे.   संजीव कुमार बलियान : पशुसंवर्धन राज्यमंत्री उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर मतदारसंघात बलियान यांनी राष्ट्रीय लोकदलाचाचे प्रमुख अजित सिंग यांचा साडेसहा हजार मतांनी पराभव केला. दंगलप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल असून १५ वर्ष ते तुरुंगात होते. २०१५ पासून ते जामिनावर बाहेर आहेत. पूर्वीच्या मंत्रिमंडळात ते कृषी आणि अन्न प्रक्रिया राज्यमंत्री होते.    प्रताप चंद्र सरंगी : पशुसंवर्धन राज्यमंत्री ओडिशातील बालासोर मतदारसंघातून श्री. सरंगी हे सुमारे १३ हजार मतांनी विजयी झाले. अत्यंत साधे राहणीमान असलेल्या सरंगी यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे काम आहे. २००४ आणि २००९ मध्ये त्यांनी निलगिरी विधासभेचे एकदा पक्षाच्या, तर दुसऱ्यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व केले. बजरंग दलाचे ते राज्य प्रमुख ही होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com