पशुसंवर्धनला अद्यापही मिळाले नाही टॅब

टॅब
टॅब

पुणे ः राज्यात हाेणारी २० वी पशुगणना टॅबमुळे रखडली आहे. केंद्र शासनाने संगणकीकृत पद्धतीने पशुगणना करण्याचे आदेश दिले हाेते. आॅक्टाेबरअखेर पशुगणना हाेणे अपेक्षित हाेते; मात्र टॅबच्या उपलब्धतेबाबतच्या दिरंगाईमुळे अद्याप टॅब उपलब्ध न झाल्याने पशुगणना रखडली असून, केंद्राने पशुगणनेला मुदतवाढ दिल्यानंतर अद्याप तारखा जाहीर न झाल्याने पशुगणना रेंगाळली आहे.  ५ हजार ३०० रुपये किमतीच्या टॅबची किमंत महाराष्ट्र आयटी महामंडळाने ११ हजार रुपये सांगितल्याने गाेंधळात भर पडली आहे. केंद्र शासनाने ‘इनाफ‘ याेजनेअंतर्गत यंदाची २० वी पशुगणना टॅबद्वारे करण्याचा निर्णय देशपातळीवर घेतला. यासाठी केंद्र सरकार टॅब उपलब्ध करून देणार हाेते; मात्र नंतर राज्यांनी टॅब खरेदी करण्याचे सांगण्यात आले. टॅब खरेदीसाठी केंद्र शासन ६० टक्के निधी देणार हाेते. राज्याने ४० टक्के रक्कम द्यायची असे ठरले हाेते. केंद्राने टॅब खरेदी करताना सहा हजार रुपयांपर्यंतच्या मर्यादेतील खरेदीसाठी परवानगी दिली. महाराष्ट्राला ७ हजार २०० टॅबची आवश्‍यकता हाेती. यासाठीची प्रक्रिया पशुसंवर्धन विभागाने सुरू केली; मात्र एेन खरेदीच्या टप्प्यातच राज्य सरकारने माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या माध्यमातूनच खरेदी करण्याचे आदेश काढले. या आदेशानुसार पशुसंवर्धन विभागाने महामंडळाकडे मागणी नाेंदविल्यानंतर महामंडळाने याच टॅबची रक्कम ११ हजार रुपये सांगितल्याने अडचण निर्माण झाली. हेच टॅब मध्य प्रदेश सरकारने पाच हजार तिनेशे रुपये दराने खरेदी केले. यामुळे टॅब खरेदीमध्ये सावळा गाेंधळ निर्माण झाला आहे.  टॅब खरेदीमधील दर निश्‍चिती आणि काेणाकडून खरेदी करायची याबाबत महामंडळाचे महासंचालक आणि शासनाची पत्रव्यवहार, चर्चा सुरू असल्याचे पशुसंवर्धन आयुक्तालयातून सांगण्यात आले; मात्र केंद्राने पशुगणनेला मुदतवाढ दिली असली तरी अद्याप तारखा जाहीर न झाल्याने २० वी पशुगणना रखडली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com