पुणे जिल्ह्यात लसीकरण पडताळणीसाठी तपासणार जनावरांच्या रक्ताचे नमुने

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : महाराष्ट्र राज्य लाळ खुरकूत रोगमुक्त पट्टा घोषित करण्यासाठी प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातही रविवारपासून (ता.२०) लाळ खुरकूत प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील १०० टक्के जनावरांना लसीकरण करण्यात आल्याची पडताळणी करण्यासाठी १० निवडक गावांमधून प्रत्येकी १० गायी आणि म्हशींच्या रक्ताचे नमुने गोळा करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी दिली.      केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्य लाळ खुरकूत रोगासाठी ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे. महाराष्ट्र राज्य लाळ खुरकूत रोगमुक्त पट्टा घोषित करण्याची शिफारस जागतिक पशु आरोग्य संघटनेकडे केली आहे. त्याअनुषंगाने संघटनेच्या पथकामार्फत राज्यात लसीकरण कार्यक्रम प्रभावीपणे राबविला गेल्याची पडताळणी करण्यासाठी अचानक तपासणी करण्यात येणार आहे. यात पशुपालकांकडून माहिती घेण्याबरोबरच लाळखुरकूत प्रतिपिंड (ॲण्टी बॉडीज) मापन पातळी तपासणीसाठी पशुधनाच्या रक्ताचे नमुने गोळा करण्यात येणार आहेत.

राज्य रोग अन्वेषण विभागाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १० गावांची निवड करण्यात येणार आहे. या गावांमधून १० गायी आणि १० म्हशींच्या रक्ताचे लसीकरणापूर्वीचे नमुने गोळा करण्यात येतील. तसेच लसीकरणानंतर ३० व्या दिवशी पुन्हा या जनावरांच्या रक्ताचे नमुने गोळा करण्यात येतील. जिल्ह्यात गोळा झालेल्या नमुन्यांची पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. यातून जनावरांमध्ये तयार झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीचे मूल्यमापन अचूकपणे करता येणार असल्याचे डॉ. विधाटे यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com