पशुसंवर्धन विभाग होणार आॅनलाइन

पशुसंवर्धन विभाग होणार आॅनलाइन
पशुसंवर्धन विभाग होणार आॅनलाइन

पुणे ः राज्यातील पशुधनसेवा अधिक गतिमान करण्यासाठी पशुसंवर्धन, दुग्ध आणि मत्स्य व्यवसाय विभाग आॅनलाइन होणार आहे. या विभागांची सेवा आणि योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी या विभागांमध्ये ई-गव्हर्नन्स प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी या विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात आली आहे.  राज्याचे प्रशासन अधिक गतिमान, लोकाभिमुख, पारदर्शी करण्यासाठी सर्वच विभागांत माहिती आणि तंत्रज्ञानाच्या वापराला सरकारने प्राधान्य दिलेले आहे. पशुंसवर्धन विभागाची सर्व कार्यालये एका संगणक प्रणालीने एकमेकांशी जोडण्यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. तसेच या विभागाच्या योजनादेखील शेतकरी, पशुपालकांना सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठीदेखील विशेष संगणक प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. यासाठी या विभागाच्या संबंधित विविध विभागांच्या दहा अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने ई-गव्हर्नन्सबाबत सर्वंकष आराखडा तयार करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार लवकरच आराखडा तयार होऊन अंमलबजावणी सुरू होईल, असे पशुंसवर्धन आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.

पशुगणना आॅनलाइन पशुसंवर्धन विभागातील सर्वांत महत्त्वाची असणारी पशुगणना २० व्या गणनेपासून आॅनलाइन करण्यात आली आहे. विविध अडथळ्यांची शर्यत पार करत रखडलेली पशुगणना अंतिम टप्प्यात आली असून, तांत्रिक कारणे आणि सर्वरच्या समस्येमुळे संथगतीने सुरू आहे. डिसेंबर २०१८ अखेर पूर्ण होणारी ही गणना अद्याप पूर्ण झाली नसून, यासाठी मार्च २०१९ ची मुदतवाढ देण्यात आली होती. आता पुन्हा मे अखेरपर्यंतची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com