पशुसंवर्धन विकासासाठी पशुपालक, शेतकऱ्यांना कर्ज

नाशिक : आत्मनिर्भर भारत अंतर्गत २०२०-२१ वर्षापासून पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत पशुपालनावर आधारित विविध प्रक्रिया उत्पादन संवर्धन घटकांसाठी कर्ज देण्यात येईल.
For animal husbandry development Loans to pastoralists, farmers
For animal husbandry development Loans to pastoralists, farmers

नाशिक : ‘‘आत्मनिर्भर भारत अंतर्गत २०२०-२१ वर्षापासून पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत पशुपालनावर आधारित विविध प्रक्रिया उत्पादन संवर्धन घटकांसाठी कर्ज देण्यात येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालक व शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात SIDBI या बँकेच्या उदयमी मित्र पोर्टलवर अर्ज सादर करावेत’’, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपआयुक्त डॉ. बी. आर. नरवडे यांनी केले.

योजनेचा लाभ, वैयक्तिक लाभार्थी, दूध, मांस, उत्पादनावर प्रक्रिया करणारे उद्योगनिर्माण करणे, पशुखाद्य, मुरघासनिर्मिती कारखाने, लिंग विनिश्चित रेतमात्रा निर्मिती, बाह्यफलन केंद्र इत्यादी पशुपालनावर आधारित घटक, खासगी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, व्यक्तिगत संस्था, कलम ८ अंतर्गत येणाऱ्या कंपन्यांना होईल. अर्ज देताना प्रकल्प अहवाल, तांत्रिक व वित्तीय बाबी, जागेचे कादपत्रे, संस्थेची आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. या बाबतची तपशीलवार माहिती dahd.nic.in व ahd.maharashtra.gov.in संकेतस्थळावर देण्यात आली आहे, अशी माहिती नरवडे यांनी दिली.

या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रकल्पाच्या ९० टक्के कर्ज शेड्यूल बँकेतर्फे देण्यात येईल. लाभार्थी हिस्सा १० टक्के असेल. बँकेकडून आकारल्या जाणाऱ्या व्याजदरात ३ टक्के सवलत देण्यात येईल. 

यासाठी मिळणार कर्ज 

योजनेंतर्गत दूध प्रक्रिया उद्योगांमध्ये आइस्क्रीम युनिट, चीज उत्पादन प्रकल्प, सुगंधी दूध, टेट्रापॅक युनिट, दूध पावडर प्रकल्प, तूप, ताक यांच्या निर्मितीसाठी, मांस प्रक्रिया उद्योगांमध्ये शेळी, मेंढी, कुक्कुट, वराह, म्हैसवर्गीय पशुधनाच्या मांसावर मूल्यवर्धित उत्पादनासाठी, पशुखाद्य प्रक्रिया उद्योगांमध्ये बायपास प्रोटीन, खनिज मिश्रण प्रकल्प, पशुखाद्य तपासणी प्रयोगशाळा, मुरघास निर्मिती प्रकल्प इत्यादींसाठी कर्ज देण्यात येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com