संयुक्त राष्ट्र संघाच्या जनरल असेंब्लीच्या ७४ व्या अधिवेशनात २०२१ हे ‘आंतरराष्ट्रीय फळे आणि भाजीप
ताज्या घडामोडी
नाशिक : पाणीटंचाई आणि चाऱ्याच्या वाढत्या दराने पशुपालक हैराण
अंबासन, जि. नाशिक : बागलाण परिसरातील गावागावांत जनावरांना चारा आणि पाण्याची भीषण स्थिती आहे. आहे. दिवसेंदिवस वाढणारा उन्हाचा तडाखा, सातत्याने जाणवणारी पाणीटंचाई, पशुखाद्य तसेच चाऱ्याचे वाढलेले भाव अशा अनेक कारणांमुळे पाळीव जनावरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. त्यामुळे गोठ्यातील जनावरांची जागाही रिकामी होत आहे.

पाळीव प्राण्यांचे गोठे चाराटंचाईमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जनावरे राखणाऱ्या गुराख्यांवरही बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. दहा वर्षांपूर्वी ग्रामीण भागात गाय, म्हैस, बैल, शेळ्यांसह इतर पाळीव प्राण्यांची संख्या मोठी होती. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी गायी-म्हशी पाळायचे. अनेक अल्पभूधारक शेतकरी हौसेखातर गायी-म्हशी पाळत.
बेरोजगारीवर मात करीत अनेकांनी सुरू केलेले पशुपालन व दुग्धव्यवसाय भरभराटीला आला होता. गुराख्यांकडे सांभाळण्यासाठी येणाऱ्या जनावरांची संख्या दीडशे ते दोनशेपर्यंत होती. या व्यवसायातून गुराख्यांना मोठा रोजगार मिळायचा. हिरवा चारा मुबलक प्रमाणात मिळायचा. चाऱ्याच्या पेंढीचे भावही सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारे होते.
]पाच-दहा रुपयांत हिरव्यागार लुसलुशीत गवताचा भारा मिळायचा. परंतु चारा आणि इतर वस्तूंमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई गुरांची आणि गोठ्यांची संख्या कमी झाली आहे. काही वर्षांपासून पर्जन्याचे प्रमाण कमालीचे घटल्याने ग्रामीण भागात शेतकऱ्यांना चारा व पाणीप्रश्न प्रकर्षाने जाणवू लागला आहे. चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत.
आमच्याकडे वडिलोपार्जित शंभरावर जनावरे आहेत. पूर्वी भरघोस चारा उपलब्ध होत होता. मात्र आजची परिस्थिती जनावरांसाठी कठीण झाली आहे. पाणी नाही, चारा नाही. आमची अनेक जनावरे शेतकऱ्यांना पाळण्यासाठी फुकटात दिली आहेत. शासनाने याकडे लक्ष द्यावे.
-खेमराज कोर, पशुपालक, अंबासन
- 1 of 1029
- ››