Agriculture news in Marathi Animal market closed; Farmers in Madhya Pradesh for buying bulls | Agrowon

पशू बाजार बंद; शेतकरी बैल खरेदीसाठी मध्य प्रदेशात

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

खानदेशात गेल्या काही दिवसांपासून पशुधनाचे बाजार बंद आहेत. यामुळे बैलजोड्यांची खरेदी करण्यासाठी अनेकांना मध्य प्रदेशात जावे लागत आहे. बैलजोड्यांचे दरही वाढले आहेत.

जळगाव ः खानदेशात गेल्या काही दिवसांपासून पशुधनाचे बाजार बंद आहेत. यामुळे बैलजोड्यांची खरेदी करण्यासाठी अनेकांना मध्य प्रदेशात जावे लागत आहे. बैलजोड्यांचे दरही वाढले आहेत.

बैलजोड्यांचे दर गुढीपाडव्यापूर्वी वाढण्यास सुरुवात होते. कारण खरिपासंबंधीच्या कामांसाठी अनेक शेतकरी नव्या बैलजोड्यांच्या शोधात असतात. अशातच खानदेशातील प्रसिद्ध बैलबाजार कोरोनामुळे बंद आहेत. यामुळे शेतकरी बैलजोड्यांसाठी गावोगावी नातेवाईक, परिचितांकडे संपर्क साधून बैलजोड्यांसंबंधी विचारणा, चाचपणी करीत आहेत. तर काही शेतकरी थेट मध्य प्रदेशातील बडवानी, बऱ्हाणपूर, खरगोन येथील बाजारांमध्ये किंवा पाड्यांवर जाऊन बैलजोड्यांची खरेदी करीत आहेत.

खानदेशात बैलांसाठी जळगाव जिल्ह्यात वरखेडी (ता. पाचोरा), नेरी (ता. जामनेर), सावदा (ता. रावेर), चोपडा, वैजापूर (ता. चोपडा), धुळ्यातील साक्री हे बाजार प्रसिद्ध आहेत. तर शेळ्यांसाठी पारोळा, नेरी, साक्री, चोपडा, वैजापूर, फैजपूर, किनगाव येथील बाजार प्रसिद्ध आहेत. पण हे बाजार बंद असल्याने बैलजोड्यांची शोधाशोध करावी लागत आहे.

अनेक शेतकरी नातेवाइकांकडून बैलजोड्या खरेदी करून घेत आहेत. त्यात अधिकचे पैसे लागत आहेत. एक बैलजोडी किमान ५२ ते ५५ हजार ते एक लाख रुपयांपर्यंत मिळत आहे. मध्य प्रदेशातही अशीच स्थिती आहे. तेथे एक लाख ते सव्वा लाख रुपयात बैलजोड्या मिळत आहेत. यामुळे मोठी गुंतवणूक त्यात करावी लागत आहे.


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात उद्यापासून वादळी पावसाचा इशारा पुणे : विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा चटका...
गटशेतीच्या पायावर ‘एफपीसी’चा कळस पुणे : राज्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना...
तोडणीला परवडेना टोमॅटो औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड तालुक्यातील...
महाराष्ट्राला साखर वाहतूक अनुदान...कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना...
संत्रा प्रक्रियेतून शेतकरी कंपनीची...वरुड (जि. अमरावती) येथील श्रमजीवी नागपुरी संत्रा...
तीन पूरक व्यवसायांचा शेतीला भक्कम आधारखरपुडी (ता.. जि.जालना ) येथील अल्पभूधारक शेतकरी...
कांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर...नाशिक : चालूवर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मागील...
उपाशी पोटाला लॉकडाउन करता येत न्हाय...! रोपळे बुद्रुक, जि. सोलापूर : कोरोनाच लय भ्या...
कर्ज परतफेडीला मुदतवाढ मिळावी गोंदिया ः गेल्या हंगामात देण्यात आलेल्या...
परभणी, हिंगोलीत २० हजार क्विंटल हरभरा...परभणी ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
लासलगावला कांदा लिलावात सहभागी होण्यास...नाशिक : सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या...
विदर्भात मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पावसाची...पुणे : झारखंड ते उत्तर कर्नाटक, छत्तीसगड आणि...
हापूसचा दराचा गोडवा टिकून रत्नागिरी ः वातावरणातील अनियमितेचा परिणाम यंदा...
राज्यात अद्याप वीस लाख टन ऊस शिल्लक कोल्हापूर : राज्यातील ऊस उत्पादक पट्यातील साखर...
बाजार समित्या बंद ठेवू नका पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमाल वितरण सुरळीत...
राज्यात चिकन, अंड्यांच्या दरात सुधारणा नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
साखर वाहतुकीसाठी क्विंटलला १०० रुपये...कोल्हापूर : पूर्वेकडील राज्यांनी वाहतूक खर्चात...
कमाल तापमान वाढण्यास सुरुवात पुणे : राज्याच्या अनेक भागांत आकाश कोरडे झाले आहे...
पीक बदलातून शेती झाली किफायतशीरनांदोस (ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग) गावातील...
देशात यंदा सर्वसाधारण पाऊस;...पुणे : देशभरात यंदा मॉन्सूनचा सर्वसाधारण पाऊस...