agriculture news in marathi, animal medical services now on app, Maharashtra | Agrowon

पशुवैद्यकीय सेवा आता ॲपद्वारे

टीम अॅग्रोवन
शनिवार, 29 जून 2019

पुणे ः पशुधनाला तातडीने आणि दर्जेदार पशुवैद्यकीय सेवा आता ॲपद्वारे मिळणार असून, पशुवैद्यकीय दवाखान्यांमधील पारंपरिक पद्धतीने ठेवण्यात येणारी पशुवैद्यकीय सेवांच्या नोंदीची विविध १८ रजिस्टरदेखील आता बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. 

पुणे ः पशुधनाला तातडीने आणि दर्जेदार पशुवैद्यकीय सेवा आता ॲपद्वारे मिळणार असून, पशुवैद्यकीय दवाखान्यांमधील पारंपरिक पद्धतीने ठेवण्यात येणारी पशुवैद्यकीय सेवांच्या नोंदीची विविध १८ रजिस्टरदेखील आता बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. 

पारंपरिक पशुवैद्यकीय सेवा आता ऑनलाइन आणि अत्याधुनिक करण्यासाठी विशेष ॲप विकसित करण्यात येत आहे. या ॲपद्वारे पशुपालक आणि शेतकऱ्यांनी आपल्याकडील विविध पशुधनाची नोंद करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. या ॲपवर संबंधित पशुवैद्यकीय दवाखाना, आणि अधिकाऱ्यांची देखील नोंद असणार आहे. पशुधनाला झालेल्या आजाराची नोंद शेतकऱ्यांनी ॲपवर करावयची आहे. यानंतर संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी पशुधनावर उपचार करणार असून, केलेल्या उपचाराची नोंद या ॲपवर करणार आहे. यामुळे संबंधित पशुधनाच्या आजार केलेला औषधोपचार यांचा इतिहास तयार होणार आहे. यामुळे भविष्यात उपचार करताना, संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला आजाराची माहिती मिळणार आहे.

तसेच, पशुधनाला अधिकच्या उपचारासाठी दवाखान्यात आणल्यानंतर व्यक्तींप्रमाणे त्यांची संगणकीय नोंद होणार असून, त्याला एक विशिष्ट कोड क्रमांक देण्यात येणार आहे. हा कोड त्या पशुधनाची ओळख असणार असून, भविष्यात कायमस्वरूपी सेव्ह असणार आहे, असेही आयुक्त मिश्रा यांनी सागितले. 

८० तालुक्यांसाठी मोबाईल हॉस्पिटल लवकरच 
महाराष्ट्रातील दुर्गम भागात पशुवैद्यकीय सेवा तातडीने मिळण्यासाठी ८० तालुक्यांसाठी मोबाईल हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. यासाठी १२ कोटींचा निधी मंजूर असून, पीपीपी तत्त्वावर ही हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. यासाठी वाहनांची निवड प्रक्रिया सुरु असून, या वाहनांमध्ये अत्याधुनिक आरोग्य सुविधा यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही आयुक्त मिश्रा यांनी सांगितले.


इतर अॅग्रो विशेष
भारतीय किसान संघामार्फत शेतकऱ्यांनी...कोल्हापूर: भारतीय किसान संघाने लॉकडाउनच्या काळात...
लॉकाडाउनमध्येही शेतकऱ्यांकडून शेतमालाची...पुणे (प्रतिनिधी)ः कोरोना टाळेबंदी मध्ये शेतमालाची...
खानदेशात साठा वाढल्याने कापूस, सरकी...जळगाव : कापसाची शासकीय खरेदी खानदेशात मागील ६ मे...
राज्यातील २८० बाजार समित्या अडचणीत;...लातूर ः राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा...
उष्णतेच्या लाटेमुळे अकोल्यात केळीचे घड...अकोला  ः जिल्ह्यात या आठवड्यात वाढलेल्या...
विदर्भात टोळधाडीची दहशत कायम;...नागपूर ः अमरावती जिल्ह्यातील पुसला गावातून...
राजस्थानातील चुरूत ५० अंशांवर तापमान;...पुणे  : सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने...
मॉन्सून ४८ तासांमध्ये दक्षिण अरबी...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
एसटीव्दारे शेतीमाल वाहतूक सुरु...पुणे  ः ‘कोरोना’मुळे महाराष्ट्र राज्य परिवहन...
तंत्रज्ञान आत्मसात करीत प्रयोगशील शेतीत...अकोला जिल्ह्यातील आस्टुल येथील संतोष घुगे यांनी...
मॉन्सूनची अंदमानात चाल;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
टोळधाडीकडून भाजीपाल्याचे सर्वाधिक...नागपूर : राजस्थान, मध्यप्रदेशनंतर टोळधाडीचा...
उन्हाच्या झळांनी काहीली वाढली पुणे : सुर्य चांगलाच तळपत असल्याने...
केळी ‘रायपनिंग चेंबर’ व्यवसाय झाला पूरक...सातारा जिल्ह्यातील अनवडी (ता. वाई) येथील प्रवीण...
अंदमानात उद्या मॉन्सूनची प्रगती शक्य पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...
राज्यात कापूस बियाणे विक्रीला प्रारंभ अकोला ः आगामी हंगामासाठी कापूस बियाणे...
मध्यम धाग्याच्या कापूस खरेदीची ...नागपूर ः एफएक्‍यु ग्रेडमधीलच तिसऱ्या दर्जाच्या...