agriculture news in marathi Animal Science in Marathwada The horses of the center are stuck | Agrowon

मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे अडलेलेच

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 जुलै 2021

परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत राज्यात मंजूर केलेल्या चार पैकी तीन पशुविज्ञान केंद्र कार्यान्वित झाली आहेत. परंतु मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे अद्याप अडलेलेच आहे.

परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत राज्यात मंजूर केलेल्या चार पैकी तीन पशुविज्ञान केंद्र कार्यान्वित झाली आहेत. परंतु मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे अद्याप अडलेलेच आहे. पशुसंवर्धन सेवा अंतर्गत प्रभावी विस्तार शिक्षण कार्यासाठी हे केंद्र कार्यान्वित करणे गरजचे आहे. 

कृषी विस्तार कार्यासाठी सुरु केलेल्या कृषी विज्ञान केंद्राप्रमाणे पशुसंवर्धन विस्तार शिक्षण कार्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेने २०१५ मध्ये राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या विभागात पशुविज्ञान केंद्रांना मंजुरी दिली. त्यादृष्टीने मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील भोकरदन, अंबड तालुक्यात जागांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. परंतु त्यापुढे प्रगती झाली नाही.

दरम्यानच्या काळात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात पशुविज्ञान केंद्र सुरु झाली आहेत. परंतु मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्र मात्र कार्यान्वित झाले नाही. सातत्याने दुष्काळाला सामोरे जावे लागत असलेल्या मराठवाड्यातील शेतकरी शेतीपूरक दुग्ध व्यवसाय, शेळी पालन, कुक्कुटपालन व्यवसायाकडे वळत आहेत. 

लाल कंधारी, देवणी हे गोवंश, मराठवाडी म्हैस या प्रजातीचे संवर्धन करणे आवश्यक आहे. सद्यःस्थितीत मराठवाडा विभागात परभणी आणि उदगीर येथील पशुवैद्यक महाविद्यालमार्फत विस्तार कार्य केले जाते. परंतु या महाविद्यालयातील रिक्त जागांमुळे विस्तार कार्यासाठी अडचणी येत आहेत. विस्तार शिक्षण कार्य प्रभावीपणे करण्यासाठी मराठवाडा विभागात सर्व सुविधायुक्त पशुविज्ञान केंद्र कार्यान्वित होण्याची नितांत गरज आहे.

विस्तार कार्यासह स्थानिक गोवंशाचे संवर्धन तसेच शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी मराठवाड्यात पशुविज्ञान केंद्र सुरु होणे गरजेचे आहे.
- डॉ. नितीन मार्कंडेय, सहयोगी अधिष्ठाता, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय,परभणी.


इतर बातम्या
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६...कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक...
यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यताकोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात...
शेतीला सोलर कुंपण घाला यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे...
सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन...रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
  सांगली जिल्हा बँकेच्या  चौकशीला...सागंली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा...
खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
खानदेशात प्रशासनाकडून रब्बीतील पीककर्ज...जळगाव  : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची...
मराठवाड्यात पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३)...
जळगाव जिल्ह्यास पावसाने झोडपलेजळगाव  : जिल्ह्यात गुरुवारी (ता.२३) अनेक...
तडवळेत जोरदार पावसामुळे सोयाबीन...कसबे तडवळे, जि. उस्मानाबाद : परिसरात गेल्या चार...
परभणी, हिंगोलीत पावसाने सोयाबीनला फुटले...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु...
ग्रामबीजोत्पादनासाठी करा ‘महाडीबीटी'’वर...परभणी  ः ‘‘यंदा रब्बी हंगामात जिल्ह्यास...