नगर जिल्ह्यात जनावरांचा उपचार चार रुपयांनी महागणार

Animal treatment in the city district will be expensive by four rupees
Animal treatment in the city district will be expensive by four rupees

नगर ः नगर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय रुग्णालयात आता जनावरांच्या उपचारासाठी एक रुपयाऐवजी पाच रुपये नोंदणी सेवा शुल्क लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समितीने नुकत्याच झालेल्या बैठकीत तसा ठराव घेतला असून तो ठराव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. त्यामुळे जनावरांचा उपचार चार रुपयांनी महागणार आहे. 

महागाई आणि लागणाऱ्या सेवामुळे ही वाढ केली जात असल्याचे पशुसंवर्धन विभागातून सांगण्यात आले. जिल्हाभरात दररोज अडीच ते तीन हजार जनावरांवर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार केले जातात. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पैशात दर दिवसाला साधारण दहा हजारांची भर पडणार आहे. ग्रामीण भागातील जनावरांवर उपचारासाठी नगर जिल्ह्यामध्ये २१६ पशुवैद्यकीय रुग्णालये आहेत. जिल्हा परिषदेत नुकतीच पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांच्या अध्यक्षतेखाली पशुसंवर्धन समितीची बैठक झाली. नोंदणी शुल्क वाढीसाठी राज्य शासनाची परवानगी लागते. त्यामुळे हा ठराव राज्य शासनाकडे मान्यतेला पाठवला आहे. 

नगर जिल्ह्यामध्ये २०११ च्या पशुगणनेनुसार साधारण सोळा लाख जनावरे आहेत. शेळ्या, मेंढ्या व अन्य जनावरे मिळून आकडा २८ लाख आहे. शासनाच्या मंजुरीनंतर सेवा शुल्क वसुलीतून दर दिवसाला अडीच हजार तर वर्षाला साधारण पावणे आठ लाख रुपये जमा होतात. आता दर दिवसाला साधारण बारा हजार रुपये तर वर्षाला साधारण पस्तीस ते चाळीस लाख रुपये जमा होतील.

कोंबडी लसीकरण शुल्कात वाढ नाही  पशुवैद्यकीय रुग्णालयातून कोंबड्यासाठीही लसीकरण करताना दहा पैसे शुल्क आकारले जाते. ते शुल्क मात्र वाढवण्यात आलेले नाही. जिल्हाभरात साधारण ८० लाख कोंबड्या आहेत. महिन्यातून एकदा किंवा दोनदा कोंबड्याला लसीकरण करून घेतले जाते. जनावरांच्या वेगवेगळ्या लसीकरणासाठीही एक रुपया शुल्क आकारले जाते. त्यातही वाढ करण्यात आलेली नाही असे पशुसंवर्धन विभागाने सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com